वडनेर भैरवला जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:23 PM2021-04-17T17:23:50+5:302021-04-17T17:24:51+5:30

वडनेर भैरव : वडनेर भैरव ग्रामपालिका, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आणि वडनेर भैरव व्यापारी असोसिएशनच्या वतीने ह्यब्रेक द चेनह्ण याअंतर्गत कोरोना रुग्णवाढीला आळा बसावा म्हणून २५ एप्रिलपर्यंत ह्यकडक जनता कर्फ्यूह्णचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुनील दत्तात्रेय पाचोरकर, उपसरपंच योगेश अशोक साळुंखे, ग्राम विकास अधिकारी रोशन बळवंत सूर्यवंशी यांनी दिली.

Wadner Bhairavala public curfew | वडनेर भैरवला जनता कर्फ्यू

वडनेर भैरवला जनता कर्फ्यू

googlenewsNext
ठळक मुद्देब्रेक द चेन : अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद

वडनेर भैरव : वडनेर भैरव ग्रामपालिका, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आणि वडनेर भैरव व्यापारी असोसिएशनच्या वतीने ह्यब्रेक द चेनह्ण याअंतर्गत कोरोना रुग्णवाढीला आळा बसावा म्हणून २५ एप्रिलपर्यंत ह्यकडक जनता कर्फ्यूह्णचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुनील दत्तात्रेय पाचोरकर, उपसरपंच योगेश अशोक साळुंखे, ग्राम विकास अधिकारी रोशन बळवंत सूर्यवंशी यांनी दिली.

पहिल्याच दिवशी बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव वक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव व्यापारी, वैद्यकीय अधिकारी, गावातील बँक, शेतकरी उत्पादक आणि भाजीपाला विक्रेते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचा उद्देश सरपंच सुनील दत्तात्रय पाचोरकर यांनी उपस्थितांना सांगितल्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपापल्या विभागाचे मत याप्रसंगी प्रदर्शित केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्याचबरोबर लसीकरणाबाबत होत असलेल्या कामाची माहिती दिली.

कृष्णा भोये यांनी शासकीय नियमांच्या अधीन राहून पोलीस स्टेशनतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि समूहावर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

या बैठकीस सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे संचालक बापूसाहेब पाचोरकर, बाळासाहेब माळी, अमोल माळी, बाळासाहेब विष्णू माळी, सुरेश वक्ते, अरुण पवार, डॉ. खैरनार, डॉ. वाल्मीक पाटील, पोलीस कर्मचारी कृष्णा भोये, नीलेश सोनवणे, कैलास पाटील, महाराष्ट्र बँक अधिकारी गुड्डू गांगुर्डे, विठ्ठल गचाले, राजेश खानापुरे आदी उपस्थित होते.


दुकाने सील करून दंड आकारणार
व्यापारी असोसिएशनच्या वतीने संजय शेलार, शिवाजी आहेर, अक्षय शहा, राजू मुल्ला यांनी आपले विचार मांडताना गावातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी संघटना जे जे शक्य आहे ते ते नक्कीच करेल. जे व्यापारी ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान ग्रामपंचायतीने एक महिना सील करून पाच हजार रुपये दंड आकारावा, असा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनीसुद्धा आपल्या गावच्या दृष्टिकोनात नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. वडनेर भैरव येथे कोरोना रुग्ण विलगीकरण कक्ष करता येईल का? यावर चर्चा होऊन सर्व बाजू पडताळून पाहता येतील, असे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम विकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी सांगितले.
 

Web Title: Wadner Bhairavala public curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.