वडझिरेकरांनी घेतला पर्यावरण रक्षणाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:10+5:302021-05-18T04:15:10+5:30
निसर्ग वाचवण्यासाठी वडझिरे गावाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे. यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबास आंब्याच्या रोपांचे वाटप ...
निसर्ग वाचवण्यासाठी वडझिरे गावाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे. यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबास आंब्याच्या रोपांचे वाटप केले आहे. तसेच नव वधूवरांना बोहल्यावर चढण्यापूर्वी वृक्षरोप भेट दिले जाते. वधूपिता या रोपांचे संगोपन करतात. आता ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावेल, त्यांची रक्षा नदी नाला व इतर ठिकाणी न टाकता त्यात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याबरोबरच प्रियजनांच्या, आप्तांच्या स्मृती जपण्याचा उद्देश आहे. गावातील अर्जुन व छबू बोडके यांचे वडील रामनाथ बोडके यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी राखेत आंब्याच्या रोपाची लागवड केली. तर वसंत व सोमनाथ मनोहर बोडके यांनी आपली आई इंदुबाई यांची आठवण कायमस्मरणात ठेवण्यासाठी त्यांच्या पश्चात मुबलक ऑक्सिजन देणारा वट वृक्ष आणि गोडव्याची महती सांगणाऱ्या आंब्याची लागवड केली. आप्तांच्या स्मृती जपण्यासाठी वडझिरेकरांनी घेतलेला हा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी लाखमोलाचा ठरणार आहे.
फोटो - १७ वडझिरे ट्री
वडझिरे गावात आईची आठवण म्हणून वट वृक्ष लागवड करताना वसंत बोडके, सुमन धात्रक, शोभा सांगळे, छाया नांगरे, सोमनाथ बोडके आदी.
===Photopath===
170521\17nsk_28_17052021_13.jpg
===Caption===
फोटो - १७ वडझिरे ट्री वडझिरे गावात आईची आठवण म्हणून वट वृक्ष लागवड करताना वसंत बोडके, सुमन धात्रक, शोभा सांगळे, छाया नांगरे, सोमनाथ बोडके आदी.