वाघबारस : वाघपूजनाच्या रात्रीच ‘अवनी’ला घातल्या गोळ्या

By अझहर शेख | Published: November 11, 2018 01:36 PM2018-11-11T13:36:57+5:302018-11-11T13:53:59+5:30

आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान

 Wagbaras: Pills put on 'Avni' on the night of tigers | वाघबारस : वाघपूजनाच्या रात्रीच ‘अवनी’ला घातल्या गोळ्या

वाघबारस : वाघपूजनाच्या रात्रीच ‘अवनी’ला घातल्या गोळ्या

Next
ठळक मुद्दे‘अवनी’ची शोधमोहिम तीचा जीव घेऊनच थांबली.आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात

अझहर शेख, नाशिक : नरभक्षक ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ‘अवनी’ टी-१ वाघिणीची शोधमोहिम वनविभागाकडून राबविण्यात आली आणि मध्यरात्री तिला बोराटी गावाच्या जंगलात (तिच्या घरात) गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्याच रात्री आदिवासी बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘वाघबारस’च्या औचित्यावर वाघ्याच्या मंदिरात एक त्र येऊन वाघपूजन करत होते. आदिवासी संस्कृतीमधील या परंपरेत मुलनिवासी नागरिकांनी वाघ अजूनही जीवंत ठेवला असला तरी याच रात्री अवनीच्या रुपाने एका वाघिणीचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
‘अवनी’ची शोधमोहिम तीचा जीव घेऊनच थांबली. यामुळे वन्यजीवप्रेमी संघटनांसह वन्यजीव अभ्यासकंंकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधींपासून मनसेच्या राज ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच वाघीणीला ठार मारणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे वनमंत्रालय टीकेचे धनी झाले आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मिडियापासून राजकिय वर्तुळापर्यंत सगळीकडे ‘अवनी’ हत्याकांडाची चर्चा सुरू आहे. एकूणच राज्यात नव्हे तर देशपातळीवर रान पेटले आहे. ‘अवनी’ने तेरा स्थानिकांचा बळी घेतल्याने तीला नरभक्षक ठरविले गेले आणि तीची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली; मात्र ही मोहीम संपुर्णत: वादाच्या भोवºयात सापडली आहे. विविध प्रश्न या मोहिमेनिमित्त उपस्थित होत आहे.
वाघ राष्टÑीय प्राणी असून आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान देण्यात आले आहे. वाघदेवता म्हणून आदिवासी गावांच्या वेशींवर आजही वाघोबाची मुर्ती नजरेस पडतात. माणूस आणि वाघाचा प्राचीन संदर्भ या परंपरेतून पुढे येतो.

Web Title:  Wagbaras: Pills put on 'Avni' on the night of tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.