दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:22 AM2019-04-04T00:22:54+5:302019-04-04T00:27:54+5:30

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.

Wait for farmers to help drought subsidy | दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देकंधाणे : काहींना प्राप्त तर अनेकांना प्रतीक्षा

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.
तालुक्याला शासनाकडून तीन टप्प्यांतील ५१ कोटी रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असताना अद्यापपर्यंत बºयाच शेतकºयांच्या खाती मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही शेतकºयांच्या खाती दोन्ही टप्प्यांतील निधी वितरित झाला आहे. काहींना अद्याप पहिल्या टप्प्यातील मदतनिधी मिळालेला नाही. मदतनिधीच्या चौकशीसाठी बळीराजाला तहसील ते बँकांच्या चकरा मारव्या लागत आहे.
चालू वर्षी नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १७ परिमंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यात गंभीर व मध्यम अशा स्वरूपाची वर्गवारी करण्यात आली होती. बागलाण तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळात समावेश करण्यात आला.
यात बागलाण तालुक्यातील ९७५६२ शेतकºयांना मदतीसाठी ८३ कोटी ५७ लाखांची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. मागणीपैकी पहिला हप्ता १७ कोटी ७ लाखांची मदत व दुसरा १६ कोटी ६५ लाखांचा हप्ता व तिसरा हप्ता २० कोटी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. शासनाने बागायती पिकांना या मदतनिधीतून वगळले आहे. फक्त जिराईत व बहुवार्षिक फळपिकांचा या मदतनिधीत समावेश करण्यात आला. यातील कोरडवाहू पिकांना हेक्टरी ६८०० रुपये अनुदान जाहीर केले.
यातील पहिला हप्ता ३४०० रुपये देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार यातील पहिला हप्ता ९ हजार देण्याचा शासन निर्णय झाला आहे. बागलाण तालुक्यातील कंधाणेतील बºयाच शेतकºयांना अद्याप मदतनिधीचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. याच गावातील ठरावीक शेतकºयांना मदतनिधीचे दोन्ही हप्ते मिळाले आहेत.आधीच शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव त्यात दुष्काळाचा अभिशाप यामुळे शेतीव्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने जाहीर केलेली तोकडी मदत अद्याप प्राप्त झाली नसून ती कुठे अडकली याबाबत मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
- सुरेश संतोष बिरारी
शेतकरी कंधाणे

Web Title: Wait for farmers to help drought subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी