’काकस्पर्श‘ होण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:23 PM2020-09-09T18:23:02+5:302020-09-09T18:23:54+5:30
देवगाव : आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागात पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. श्रध्येने प्रत्येक घरात श्राद्ध घातले जातात. मात्र, पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही आठवण येत नाही. परंतु या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी व आपण टाकलेल्या नैवेद्याचा घास घेण्यासाठी घरोघरी कावळ्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जपली जात आहे. पितरांना आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची जुनी परंपरा आहे. पितृ पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो आणि पितृ आमवस्येला त्याची सांगता केली जाते. या पितृपंधरवाड्याच्या दरम्यान, आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार घास देण्याची प्रथा परंपरा असल्याने या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्त्व प्राप्त होते. कावळ्याने जर नैवेद्य घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवत नाहीत. आजही बर्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहेत. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पितृपंधरवड्यात खाऊन सुतावलेला दिसून येतो. मात्र, सद्या या कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. पितरांच्या घासला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बर्याचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.