जोपुळ रस्त्याच्या कामाला थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 07:08 PM2019-03-05T19:08:12+5:302019-03-05T19:08:32+5:30
पिंपळगाव बसवंत : जर्मन तंत्रज्ञानावर आधारित जोपुळ रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना खाजगी मालमत्तेच्या जागेत रस्ता होत असल्याची तक्र ार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे निफाड न्यायालयाने जोपुळ रस्त्याच्या अंतिम टप्यात आलेल्या जर्मन तंत्रज्ञानाच्या कामाला स्थगिती दिल्याने पालखेड डावा कालव्यावरील पूल व लगतच्या रस्त्याचे काम थांबले आहे.

महामार्गापासून जोपुळ रस्त्यावरील बाजार समिती पर्यंत चार किलोमीटर रस्त्याचे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित काम झपाट्याने सुरू असताना रस्त्यालगतच्या खाजगी जागा मालकांनी खाजगी मालकीच्या जागेत बांधकाम विभाग सहा फुटापर्यंत अतिक्र मण करीत असल्याच्या मद्यावरून न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यामुळे न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली आहे. तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता शासकीय जागेतूनच जात असल्याचा दावा केला आहे.