शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा वाढणार ; आता पूर्व प्राथमिक शिक्षणही ‘ऑनलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:59 PM2020-07-24T18:59:26+5:302020-07-24T19:02:28+5:30
कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शाळांनीही ऑनलाइन शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची आखणी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाशिक : राज्यातील कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शाळांनीही ऑनलाइन शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची आखणी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यात १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु, अद्याप प्रत्यक्ष शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाही. ऑनलाइन शाळा भरविल्या जात असल्या तरी सुरुवातीला शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सूचनांमध्ये पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने पूर्व प्राथमिक व प्राथमिकसह माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठीही ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी व स्कीन टाइम याविषयी नियमावली जाहीर करून पूर्व प्राथमिकपासून ऑनलाइन शिक्षणाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही पूर्वीच्या निर्णयात बदल करून पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या ऑनलाइन वर्गांना परवानगी दिली आहे. त्यासाठी इयत्तानिहाय ऑनलाइन वर्गांचे कालावधीही शिक्षण विभागाने निश्चित करून दिले आहे. पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचे हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात अंदाजे तारखा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, आता पूर्वप्राथमिकपासून ते थेट बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन होत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची आखणी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.