दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:28 AM2018-07-14T00:28:22+5:302018-07-14T00:28:22+5:30

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांची वाढीव मुदत देण्यात आल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेशासाठी वाढवून दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ५ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, शिक्षण विभागातर्फे अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Wait for second quality list | दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा

दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देअकरावी : दुसºया फेरीत बुधवारपर्यंत प्रवेशाची संधी

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांची वाढीव मुदत देण्यात आल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेशासाठी वाढवून दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ५ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, शिक्षण विभागातर्फे अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारी (दि. १६) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी पहिल्या यादीतील ११ हजार ५२६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आहेत.
पहिल्या गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्र माचे महाविद्यालय मिळू शकलेले नाही. त्यामुळे प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याहून कमी असून राहिली आहे. पहिल्या यादीत ६ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रथम, १ हजार ८२३ विद्यार्थ्यांना द्वितीय तर ३ हजार ४५ विद्यार्थ्यांना तृतीय पसंतीक्र माच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली होती, त्यापैकी द्वितीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे टाळले असून, आता त्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आॅनलाइन प्रवेश भरलेले नव्हता, त्यांनी गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवसांत भाग १ व भाग २ भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्यांनाही दुसºया फेरीत प्रवेशाची संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
२३ जुलैला तिसरी यादी
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार १६ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तर १९ जुलै तिसºया फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील व दुसºया फेरीचा कटआॅफ जाहीर करण्यात येणार असून १९ व २० जुलैला पुन्हा प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार २३ जुलैला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: Wait for second quality list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.