शाळेतील बोलक्या भिंतींची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:02 PM2021-02-18T18:02:56+5:302021-02-18T18:07:39+5:30

सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपीकरणात भर घालत आहेत.

Wait for the talking walls of the school | शाळेतील बोलक्या भिंतींची लागली वाट

शाळेच्या भिंतीवर निवडणूक आयोगाचे परमानंट फलक.

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा घाट : सांकेतिक क्रमाकांमुळे विद्रुपीकरण

सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपीकरणात भर घालत आहेत.

आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूका विविध माध्यमातून पार पाडल्या जातात. या निवडणूका पार पाडण्यासाठी व मतदानासाठी लागणारी यंत्रसामुग्री ठेवण्यासाठी खोल्यांची (बुथची) गरज असते. यासाठी प्रत्येक गावात असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेंच्या तसेच खाजगी शाळांमधील खोल्या मतदानासाठी वापरल्या जातात. या खोल्यांना त्या त्या वेळच्या असणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात विशिष्ट सांकेतिक नंबर दिले जात असत. पूर्वी शाळेच्या दरवाजावर एक छोटासा गोल करुन त्यामध्ये वॉर्ड नंबर व मतदारसंघांचा नंबर दिला जात होता. त्यामध्येही नंतर वाढ होऊन दोन दोन गोल व त्यामध्ये वॉर्ड नंबर व मतदार संघाचे नाव लिहण्यात येऊ लागले.
परंतु अलीकडच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मतदान हे इन कॅमेरा किंवा सीसीटीव्ही लावून होऊ लागले . त्यामुळे खोलीच्या दरवाजावरील लिखाण हे दरवाजे उघडे असल्या कारणाने दिसून येत नाही म्हणून सदर क्रंमांक हे भिंतीवर लिीहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आकर्षक रंगरंगोटी करून सजवलेल्या भिंतीवर या सांकेतीक गोलांचे व अक्षरांचे आक्रमण झाले व या भिंतींच्या चित्रांवरच वॉर्ड नंबर, मतदार संघ क्रमांक रंगवले गेले.
बोलक्या भिंतीची वाट लागली

शाळेतील शिक्षकांनी मोठ्या कष्टाने सचित्र बनवलेल्या या बोलक्या भिंतींना जास्तच विद्रूपता आली आहे. बाल वयात मुलांना शिक्षणासोबत आता निवडणूकीच्या पाट्या वाचण्याची वेळ आली आहे. निवडणूकीसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या निवडणूक आयोगाकडून शाळेंच्या असलेल्या या बोलक्या भिंतींना विचित्र दिसण्यापासून वाचवण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.

महापुरुषांची ओळख, त्यांचा इतिहास तसेच समाज सुधारण्याचे संदेश शाळेच्या भिंतीवर लिहून एक सर्वच शाळांमध्ये आदर्श निर्माण केला आहे. शाळेला येणारा निधी, लोकवर्गणी यामधून अनेक ठिकाणी शाळेच्या भिंती बोलक्या केल्यात, पण निवडणुकीत बोलक्या भिंतीची पार वाट लागली आहे.
- महेश जाधव, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सायखेडा.

शाळेच्या बोलक्या भिंती शासकीय अनुदान, तर काही ठिकाणी लोकवर्गणीतून केल्या आहेत. निवडणूक काळात सूचना फलक कलरने केले जातात, ते तात्पुरते स्वरूपात असावेत अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहेत.
- सिंधूबाई गीते, उपसरपंच, शिंगवे.
 

Web Title: Wait for the talking walls of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.