बडदेनगर-पाटीलनगर भागातील रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:24 PM2020-05-27T22:24:39+5:302020-05-27T23:57:41+5:30
सिडको : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे डांबरीकरणाअभावी बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करून पाच कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला. परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्ता संपूर्ण धुळीत गेला आहे.
सिडको : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे डांबरीकरणाअभावी बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करून पाच कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला. परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्ता संपूर्ण धुळीत गेला आहे. पावसाळ्याच्या आधी सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
जुने सिडकोमधील बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता डांबरीकरण करावा, या मागणीासाठी नगरसेवक राजेंद्र महाले, कल्पना पांडे, प्रवीण तिदमेंसह कल्पना चुंभळे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून सुमारे पाच कोटी रु पयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सदरच्या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आलेले आहे. त्यावर मुरूम टाकून हा रस्ता तयार करण्यात आला असला आहे.
डांबरीकरणाअभावी संपूर्ण रस्त्यावर धुळीचे लोट उठतात. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदरचा रस्ता पूर्ण झाल्यास सातपूर, अंबड या भागातील कामगारांना ये-जा करण्यासाठी तसेच नागरिकांना सोईचे होणार आहे. परंतु महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे सदरचा रस्ता धुळीत गेला आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-------------------------
४काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकारीनी व नगरसेवकांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी येथील भैरवनाथ मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी अधिकारी व नगरसेवकांची भेट घेऊन रस्ता त्वरित डांबरीकरण करावा, अशी मागणी केली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास कामगारवर्गासह नागरिकांना सोईचे होणार आहे.