तुटलेल्या पुलाला दुुरुस्तीची प्रतिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:57 PM2020-08-31T17:57:13+5:302020-08-31T18:11:32+5:30
मनमाड : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रामगुळणा पांझण नदिला आलेल्या पुरामुळे बुरकुलवाडी भागाकडे जाणारा फरशी पुल तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटलेला पुल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.
मनमाड : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रामगुळणा पांझण नदिला आलेल्या पुरामुळे बुरकुलवाडी भागाकडे जाणारा फरशी पुल तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटलेला पुल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.
गेल्या वर्षी पांझण रामगुळणा नदिला आलेल्या पुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले होते. या मधे एचएके हायस्कुलच्या मागच्या बाजुला शहरातून बुरकुलवाडी, किर्तीनगर, सिकंदर नगर, माउली नगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला जोडणारा फरशी पुल तुटला होता. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने पुलाची दुरावस्था झाली होती.या भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.मुख्याता या भागातून एचएके हायस्कुल कडे मोठया प्रमाणात विद्यार्थी येत असतात. हा पुल तुटल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारून महामार्गाने गावाकडे यावे लागत होते. या मुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता झाल्याने नागरिकांकडून या पुलाच्या दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती.या बाबद वारंवार तक्रारी करूनही संबंधीत यंत्रणेने केवळ मुरूम टाकून तात्पूरती डागडुजी केली होती. यामुळे पुलावरून वहातूक सुरू झाली असली तरी तुटलेल्या पुलावरून चालतांना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.शाळा सुटल्यानंतर सिकंदर नगर कडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची या पुलावर गर्दी होत असते.पुलाची सध्याची अवस्था पहाता पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते.
दरम्यान तीस ते पस्तीस वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाची सध्या दुरावस्था झाली असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या पुलाची उंची वाढउन दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख यांच्या नेतृत्वाखाली या भागातील अनेक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार करूनही हा पुल दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने नागरिकांकडून सांताप व्यक्त करण्यात येत आहे.मनमाडला विसर्जनासाठी सहा
ठिकाणी मुर्ती संकलन केंद्रमनमाड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दी होउ नये या साठी पोलीस तसचे पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात पाच ठिकाणी मुर्ती विसर्जन कुंड सहा ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहे.नागरिकांनी सोयीनुसार मुर्ती विसर्जन करावे अथवा संकलन केंद्रात मुर्ती देण्यात यावी असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विसर्जन करण्यासाठी येणाºया नागरिकांना मास्क व सॅनीटायझर वापरणे बंंधनकारक करण्यात आले आहे. शहरात गणेशकुंड दत्त मंदिर रोड, ट्रेनिंग कॉलेज जवळ, बुरकुलवाडी, बुधलवाडी व शिक्षक कॉलनी तात्पुरते गणेश कुंड या सहा ठिकाणी मुर्ती विसर्जन करता येणार आहे.तर पोलीस परेड ग्राउंड, शाळा क्रमांम १४, आंबेडकर नगर प्राथमिक शाळा, विवेकानंद नगर गणपती मंदिर, शांतीनगर, रेल्वे इंस्टीट्यूट या सहा ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्र करण्यात आले आहे.नागरिकांनी घरूनच आरती करून मुर्ती विसर्जनासाठी आनणे आवश्यक आहे.विसर्जनाच्या वेळी कुठलेही पारंपारीक ,देशी, विदेशी वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विसर्जनाची वेळ देण्यात आली आहे.