भगूरला रस्ते दुरुस्तीची नागरिकांना प्रतीक्षा

By Admin | Published: October 30, 2016 11:37 PM2016-10-30T23:37:27+5:302016-10-30T23:45:43+5:30

भगूरला रस्ते दुरुस्तीची नागरिकांना प्रतीक्षा

Waiting for civilians to repair road to Bhagur | भगूरला रस्ते दुरुस्तीची नागरिकांना प्रतीक्षा

भगूरला रस्ते दुरुस्तीची नागरिकांना प्रतीक्षा

googlenewsNext

भगूर : भगूर नगरपालिका निवडणुकीत सध्या एकूण आठ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग ७ मध्ये दÞोन वॉर्ड असून, ७अ/ ७ब असे यात दोन नगरसेवक आहेत. या प्रभागची एकूण मतदार संख्या १२२९ असून महिला ६०१ पुरु ष ६२७ इतर १ आहे.
येथील प्रभागरचनेनुसार लक्ष्मीनारायण मंदिर, आर्य समाजमंदिर, धर्माधिकारी पथ, सावरकर पथ, उत्तरेकडून रामचंद्र दिवटे यांचे घर नं.४५४ पासून दक्षिण हद्दीत देशमुख यांचे सि.स.नं. ३७९ रस्त्यावर करंजकर घर नं ३८० पासून सावरकर पथाने बाबाराव राजगुरू घर नं. ३९० वरून देवगिरे यांचे घर नं. ४३० आणि नेहरू पथाने पोस्ट आॅफिसकडून पंचदीप सोसायटी हद्दीने कुडारीया यांचे घर नं. २४३ पर्यंत, रे.स.न १०१ डी.पी रोडने बोराडे यांचे घर. नं ४४३ पासून शेजवळ यांचे घर, वळसूबाई मंदिरापर्यंत, राममंदिर ते दिवटे यांचे घर नं.४५४ पासून यादव यांच्या घरापासून पुढे डी.पी.रोडने रे. स. न. ४४४ नाल्यापर्यंत, परीसरातील मार्ग इतर या प्रभागात समाविष्ट आहे. नगरसेवक संगीता कासार या शहर विकास आघाडीच्या आहेत तर संजय शिंदे हे शिवसेना नगरसेवक असुन गेली दहा वर्षे पदावर आहेत. या प्रभागात पथदिप, रस्ते आदि विविध कामे करून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्ते नाले गटारी कामे झाली आहेत.
प्रभागात सर्व रस्तेचे मजबूत काँक्रि टीकरण आहे. तर लोकसंख्ये प्रमाणे नवीन विशेष कामे नसुन काही कीरकोळ कामे पुढील नगरसेवकाला करावे लागणार आहे. नगरसेविका कासार या सत्ता परीवर्तनात प्रथम नगराध्यक्ष पदाच्या निश्चित झालेल्या दावेदार होत्या. परंतु त्याना नगराध्यक्ष होण्याचा मान शेवट पर्यंत मिळाला नाही. (वार्ताहर)

Web Title: Waiting for civilians to repair road to Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.