जिल्ह्यातील शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:44+5:302021-06-27T04:10:44+5:30
नाशिक : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्बंध लवकर शिथिल होऊन पाचवी ते दहावी वर्गाच्या शाळा सुरू करता ...
नाशिक : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्बंध लवकर शिथिल होऊन पाचवी ते दहावी वर्गाच्या शाळा सुरू करता येतील का यासंदर्भात शिक्षण विभागाची प्राथमिक कार्यवाही सुरू झालेली आहे. शिक्षण विभागाने गावपातळीवरील आढावा घेऊन कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू करता येईल का याविषयी चाचपणीही सुरू केली आहे. परंतु, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोनाचे भयंकर रूप पाहायला मिळाले. त्यामुळे नाशिकमध्ये निर्बंध अधिक काळ राहिल्याने अद्याप शिक्षण विभागाने गावपातळीवरील परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही. परिणामी नाशिकमधील शाळा सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनासोबतत एक दोन दिवसांत चर्चा करून गावपातळीवरील स्थितीचा आढावा घेऊन शाळांसदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
----
जिल्ह्यातील एकूण शाळा - ५६२६ जि. प. शाळा - ३२६६
महापालिकेच्या शाळा - १०२
अनुदानित शाळा - ८७५
विनाअनुदानित शाळा - २८९
---
एकूण - १९०७
कोरोनोमुक्त गावे - ८६८
---
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली -१,१७,०४५
दुसरी - १,२१,३४२
तिसरी -१,२०,६१८
चौथी - १,२३,९३९
पाचवी - १,२२,७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी - १,१८,३३२
आठवी - १,१५,९१०
नववी- १,११,४२१
दहावी - ९८,९५९
अकरावी- ६८१६०
बारावी - ९८,९५९
कोट-
शाळा सुरू करण्यासंदर्भात गावपातळीवर आढावा घेण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने अद्याप गाव पातळीवर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासंदर्भात सद्य:स्थितीचा आढावा घेतलेला नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासंदर्भात एक दोन दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गावपातळीवरील स्थितीचा आढावा घेऊन शाळांसदर्भात निर्णय घेतला जाईल.
- डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी
===Photopath===
260621\26nsk_12_26062021_13.jpg
===Caption===
शाळेला कुलुप