आणीबाणीतील मिसाबंदीची प्रतीक्षा संपली.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 07:55 PM2019-01-29T19:55:24+5:302019-01-29T19:55:58+5:30
येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

१९७५ ते १९७७ च्या दरम्यान कारावासात गेलेल्या अनेकांच्या प्रपंचाची धूळधाण झाली आहे. सातत्याने मिसा बंदी व सत्याग्रहिच्या पदरात निराशेशिवाय काहीही पडले नव्हते. या दरम्यान काहीतरी पदरात पडेल, या प्रतीक्षेत असलेल्यांपैकी अनेक जेष्ठ स्वर्गवासी देखील झाले. दरम्यान आणीबाणीतील मिसाबंदीना मानधन देण्यासंदर्भात एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने आणीबाणी विरोधात लढ्यात एका महिन्यापेक्षा अधिक काळ मिसाखाली कारावास भोगला त्यांना दहा हजार, त्यांच्या पश्च्यात पत्नीला पाच हजार, महिन्यापेक्षा कमी कारावास भोगणाºया बंदींना दरमहा पाच हजार, त्यांच्या पश्च्यात पती अथवा पत्नींना अडीच हजाराची पेन्शन थेट मिळणार असल्याने मिसाबंदी व सत्याग्रहीची समाधान व्यक्त केले आहे.
यानिमित्ताने येवल्यात आजही ९१ वर्ष वयोमान असलेले पुरु षात्तम भिंगारकर यांचे निवासस्थानी रमाकांत भावसार, सुधाकर कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापुरकर यांनी एकत्रीत येत आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आता मानधन मिळणार म्हणून समाधान व्यक्त केले होते.
येवल्यातील रा. स्व. संघाच्या काही कुटुंबाची वाताहत झाली. येवल्यातील २० राजबंदी सत्याग्रहींना तत्कालीन परिस्थितीत शिक्षेचा सामना करावा लागला. त्यातील ११ राजबंदी सत्याग्रही स्वर्गवाशी झालेत. सध्या ९ सत्याग्रहींचा येवलासह परिसरात रहिवाशी आहे. येवला शहरात स्व. डॉ. कांतीलाल पटेल, स्व. उत्तमचंद चंडालिया, पुरु षोत्तम भिंगारकर, बाळासाहेब गौरकर यांना तत्कालीन मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती.
तसेच १४ नोव्हेबर १९७५ ते १४ जानेवारी १९७६ या दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशभर आणीबाणीच्या निषेधार्थ सत्याग्रहात कै. जगन्नाथ सोनवणे (मंत्री), कै. बन्सीलाल हलवाई, कै. बाटुमल सिंधी, कै. काशिनाथपंत चव्हाण, कै. दशरथ नागपुरे, व रमाकांत (मामा) भावसार, सुधाकर कुलकर्णी यांचा सहभाग होता.
३० डिसेंबर १९७५ रोजी येवला शहरातून दुसºया तुकडीने सत्याग्रह केला. या तुकडीत सर्व महाविद्यालयीन तत्कालीन तरु णांचा सहभाग होता. यात धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापूरकर, डॉ.राजेश कांबळे, वसंत खोजे, तसेच कै. दौलत काळे, कै. विकास जोशी व कै. दत्तात्रय चव्हाण (भावसार) यांचा समावेश होता.