वशिलेबाजी मुळे अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:26 AM2020-09-18T00:26:38+5:302020-09-18T00:26:38+5:30
नाशिक- जीवनाचा शेवट तरी योग्य व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या छळवणूकीमूळे एका मृत व्यक्तीला चक्क अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे राहावे लागले. शहरात कोरोनामुळे मध्यंतरी अंत्यसंस्कारासाठी वेटींगचा प्रकार उघड झाला होता. मात्र, नंतर आता अंत्यसंस्कारासाठी वशिलेबाजी आणि दबाव सुरू झाला आहे. एका अधिका-याच्या नातेवाईकासाठी अमरधाममध्ये दिंडोरी येथील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला प्रतिक्षेत ठेवण्यात आले असून या प्रकरणी तक्रारीनंतर आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या कोरोनामुळे शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात शहराबाहेरील रूग्णांचा देखील समावेश असतो. जिल्हयातील ग्रामीण भागातून रूग्ण शहरात उपचारासाठी येत असतात. दिंडोरी येथील एका रूग्णाला आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे या वृध्द रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळष नातेवाईकांनी अमरधाममध्ये नोंदणी केली. मात्र, दिंडोरीतून नातेवाईक येण्यास विलंब झाल्याने ते विलंबाने अमरधाम मध्ये पोहोचले यावेळी सकाळची वेळ देऊन बुधवारी (दि.१६) विलंबाने आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला. महापालिकेच्या एका अधिका-याच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने
त्यांच्यावर आधी अंत्यसंस्कार होतील असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईक खोळंबले. त्यांनी वारंवार विनंती करून देखील कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे एकाने स्थानिक नगरसेवकाडे तक्रार केली. या नगरसेवकाने कर्मचा-यांची कानउघडणी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.