शिरवाडे वणी परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:07+5:302021-09-27T04:15:07+5:30

मागील वर्षाच्या तुलनेत परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. विहिरींना सुद्धा जेमतेमच पाणी उतरले आहे. त्यामुळे पुढील ...

Waiting for heavy rains in Shirwade Wani area | शिरवाडे वणी परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा

शिरवाडे वणी परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

मागील वर्षाच्या तुलनेत परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. विहिरींना सुद्धा जेमतेमच पाणी उतरले आहे. त्यामुळे पुढील रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत . सुरुवातीच्या काळात जेमतेमच पाऊस झाला. पूर्वा नक्षत्र सर्वसाधारण बरसल्याने फायदा होण्याऐवजी पिकांचे नुकसानच झाले. खरीप हंगामात पिकांना आवश्यक तेवढा भाव न मिळाल्यामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी वर्गात बऱ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. आता रब्बी हंगामाकडे शेतकरी वर्गाच्या नजरा वळू लागल्या आहेत. रब्बी हंगामातील रांगडा कांद , उन्हाळी कांदे, गहू, हरभरे, उन्हाळी मका व भाजीपाला ही पिके घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सध्या जमिनीत ओलावा असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची जास्त गरज नसून पिकांना पाणी देण्यासाठी सुरुवात केल्यानंतर विहिरी लवकरच तळ गाठतील व पुढील हंगामातील पिके घेण्यासाठी पाणीटंचाई भासणार आहे.

Web Title: Waiting for heavy rains in Shirwade Wani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.