येवला तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:21+5:302021-06-20T04:11:21+5:30
येवला तालुक्यातील उत्तर- पूर्व भागात खरिपामध्ये मका, सोयाबीन,कापूस, मूग, बाजरी आदींसह विविध पिकांची पेरणी केली जाते. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे ...
येवला तालुक्यातील उत्तर-
पूर्व भागात
खरिपामध्ये मका, सोयाबीन,कापूस, मूग,
बाजरी आदींसह विविध पिकांची
पेरणी केली जाते. शेतकऱ्यांनी
महागडी बियाणे खरेदी करून
पेरणी केली आहे. सुरुवातीला
झालेल्या पावसामुळे सर्वांनीच खरिपाची पेरणी केली. सध्या पिकाची उगवण काही ठिकाणी झाली तर अनेक ठिकाणी झालीच नाही. काही बीज अंकुरतच असताना जळून नष्ट
होत आहेत. पेरणी होताच पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके सुकू
लागली आहेत.
थोड्याशा पावसावर खरीप
हंगामातील पेरणी झालेल्या
पिकांना आता दमदार पावसाची
आवश्यकता असून, परिसरातील
शेतकरी आकाशाकडे डोळे
लावून बसलेला आहे. दहा
दिवसांपासून पावसाने उघडीप
दिल्याने वरच्या पाण्यावर
अवलंबून असलेली कोवळी
पिके धोक्यात आली आहेत.
दरम्यान, उधार उसनवार करून पेरणीसाठी खर्च केला.
आता शेतीसाठी केलेला खर्च
वाया जाण्याची भीती आहे.
परिसरात पाऊस गायब होऊन कडक ऊन पडले आहे.
जमिनीत पाणीच नसल्यामुळे कोवळी पिके उन्हामुळे
करपून जात असून, सुकू लागली आहेत. अजून दोन-
तीन दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट
उभे राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
येवला पश्चिम भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, जळगाव नेऊर, मुखेड एरंडगाव, देशमाने भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मशागती केल्या; पण आता वरुणराजा रुसल्याने पेरणीयोग्य पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
कोट...
मी नऊ एकरावर मका, सोयाबीन, बाजरी, मूग पिकांची पेरणी केली; पण पेरणी केल्यानंतर पाऊस उघडल्याने पेरणी केलेले बियाणे कुठेतरी उगवले, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
- राजेंद्र लहरे, शेतकरी, मातुलठाण, ता. येवला
कोट...
येवला उत्तर पूर्व भागात पेरणी करून दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, पिके पाण्याअभावी करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
- श्रावण पाटील देवरे, शेतकरी, न्याहारखेडे, ता. येवला
फोटो - १९ जळगावनेऊर १
न्याहारखेडे येथील शेतातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पीक पाहताना शेतकरी.
===Photopath===
190621\19nsk_22_19062021_13.jpg
===Caption===
न्याहारखेडे येथील शेतातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पीक पाहतांना शेतकरी.