मालेगावच्या यंत्रमाग कामगारांना घरवापसीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:21 PM2020-05-03T21:21:38+5:302020-05-03T21:23:48+5:30
मालेगाव : शहरात मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील यंत्रमाग मजूर अडकून पडले असून, लॉकडाउनमुळे त्यांची उपासमार होत असल्याने त्यांना घरवापसीची आस लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील यंत्रमाग मजूर अडकून पडले असून, लॉकडाउनमुळे त्यांची उपासमार होत असल्याने त्यांना घरवापसीची आस लागली आहे.
मालेगाव शहरात मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून यंत्रमाग कामगार आले असून, ते जाफरनगर, नूरबागसह शहरात विविध भागात राहतात. राज्य शासन परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात पुन्हा परत पाठवित आहे.
शुक्रवारी (दि.१) नाशिकहून रेल्वेने काही मजुरांना त्यांचे गावांना रवाना करण्यात आले तसेच येथील कामगार लोकांनाही त्यांच्या राज्यात परत पाठवावे, अशी त्यांची मागणी आहे. आता दोन वेळा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. सध्या यंत्रमाग व्यवसाय बंद असून, यंत्रमागमालक त्यांना पैसे द्यायला तयार नाहीत, यामुळे यामुळे या यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.