मुंबई महामार्गाची खड्ड्यातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:01 AM2019-08-20T01:01:52+5:302019-08-20T01:02:42+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

 Waiting for Mumbai Highway | मुंबई महामार्गाची खड्ड्यातून वाट

मुंबई महामार्गाची खड्ड्यातून वाट

Next

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटातून मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या वाहनचालकांना भेडसावित असताना राष्टय महामार्ग प्राधिकरण व काम करणाऱ्या ठेकेदाराकडून काहीच उपाययोजना केली जात नसल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविले गेले नसल्यामुळे व त्यातच रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ कायम असल्याने खड्ड्यांमध्ये वाढ झाली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. औरंगाबाद नाका, मीनाताई ठाकरे स्टेडियमसमोरील सर्व्हिसरोड, के. के. वाघ कॉलेज, अमृतधाम चौफुली, हनुमाननगर, जुने बळी मंदिर परिसर, बहिणाबाई चौधरी कॉलेज, जत्रा हॉटेल, कोणार्कनगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले
आहेत.
वाहनचालकांची कसरत
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना आता वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामाचा अडथळा तर आहेच शिवाय वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे अशा तिहेरी संकटातून वाहनचालकांची कसरत सुरू आहे.
४ एका बाजूला टोल कंपनीकडून वाहनचालकांकडून कोट्यवधी रुपये टोल स्वरूपात वसूल केले जात असताना खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात मात्र टोल कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार केली जात आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title:  Waiting for Mumbai Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.