नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:00 PM2017-11-22T15:00:35+5:302017-11-22T15:04:58+5:30

जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही,

Waiting for the order in rainy season in Nashik district | नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

Next
ठळक मुद्देआॅक्टोबर महिन्याची नाही नुकसान भरपाई : त्यात पुन्हा नुकसानीची भरसर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात


नाशिक : आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतक-यांना शासनाकडून भरपाई मिळण्याची प्रतिक्षा कायम असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर बसरणाºया पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायचे किंवा नाही याबाबत शासन पातळीवर अद्याप कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नुकसान झालेले शेतकरी गर्भगळीत झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतक-यांना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही, परिणामी शासनाकडून आॅक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्यापही दिलासा दिलेला नाही. जवळपास ५० हजार शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील बदल रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम करू लागले आहे. अशातच मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात सापडल्या तर शेतात काढून ठेवलेला मका व बाजरीचे नुकसान झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवस हवामान खराब राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शासन पातळीवर तसे कोणतेही आदेश अद्याप देण्यात आलेले नसल्याने यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे.

Web Title: Waiting for the order in rainy season in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.