पेठेनगर यू-टर्नच्या कामासाठी पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:10 AM2018-09-18T01:10:44+5:302018-09-18T01:11:11+5:30

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे.

 Waiting for a police handout for the work of Pethhenagar U-Turn | पेठेनगर यू-टर्नच्या कामासाठी पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा

पेठेनगर यू-टर्नच्या कामासाठी पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा

Next

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे.  वाहनचालकांच्या सोयीसाठी होत असलेल्या या कामाला होत असलेला विरोध मोडून काढण्याचे पोलिसांनी ठरविल्याने गणेश विसर्जनानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावरून धावणाºया वाहनांनासाठी उड्डाणपुलाची सोय करण्यात आली असली तरी, सिडको व इंदिरानगर या दोन्ही भागात ये-जा करण्यासाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग तयार करूनही या मार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे. त्यातूनच इंदिरानगर बोगदा तयार करण्यात आला, परंतु त्यातूनही प्रश्न सुटत नसल्याने आता सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यान भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पेठेनगर ते लेखानगर या दरम्यान उड्डाणपुलाखालून दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना ये-जा करण्याची सोय केल्यास अन्य भुयारी मार्गावर वाहनांचा पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पुलाच्या खालील पिलर क्रमांक पाच व सहा या दोघांच्या मधून यू टर्न करण्याच्या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीच सदरचे काम सुरू करण्याचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला होता. परंतु लेखानगर समोरील काही रहिवाशांनी या कामाला विरोध दर्शवून राजकीय वजन वापरल्यामुळे काम थंड बस्त्यात पडले. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी सुंदरबन कॉलनीजवळ उड्डाणपूल ओलांडत असताना दोघा माय-लेकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पेठेनगर यू टर्नच्या कामाने उचल खाल्ली आहे.
१५ तारखेनंतर काम सुरू होणार
स्थानिक नागरिकांनी लेखानगरच्या पिलर क्रमांक ३ येथून यू टर्नचे काम सुरू करावे, असा आग्रह धरला आहे, तथापि तसे केल्यास या महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा या कामाला असलेला विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. पोलिसांनी गणेश विसर्जनानंतर बंदोबस्त देण्याचे ठरविल्याने १५ आॅक्टोबरनंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Waiting for a police handout for the work of Pethhenagar U-Turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.