पोलीस ठाण्याच्या इमारतीची प्रतीक्षा संपली शीतल सांगळे : समाजोपयोगी कामात लोकसहभाग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:59 PM2018-03-03T23:59:14+5:302018-03-03T23:59:14+5:30
सिन्नर : शंभर वर्षांच्या संघर्षानंतर वावी पोलिसांना हक्काची इमारत मिळत असल्याची बाब आनंददायी असली तरी इमारत होण्यासाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागल्याची खंत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी व्यक्त केली.
सिन्नर : शंभर वर्षांच्या संघर्षानंतर वावी पोलिसांना हक्काची इमारत मिळत असल्याची बाब आनंददायी असली तरी पोलिसांची संघटना नसल्याने स्वत:ची इमारत होण्यासाठी पोलिसांना शंभर वर्षे वाट पाहावी लागल्याची खंत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा रेंगाळणाºया पण समाजोपयोगी असणाºया कामांत लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
वावी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे, सरपंच नंदा गावडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक रणजीत आंधळे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पोलीस ठाण्याची सुंदर इमारत होईल यात शंका नाही मात्र येथील कामकाजही पारदर्शी व चांगले व्हावे अशी अपेक्षा आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, विजय गडाख, जगन्नाथ भाबड, बाबासाहेब कांदळकर, दीपक बर्के, राजेंद्र घुमरे, उपसरपंच विजय काटे, माजी सरपंच रामनाथ कर्पे, चंद्रकांत वेलजाळी, विठ्ठल राजेभासले, सतीश भुतडा, अॅड. शरद चतुर, ईलाहीबक्ष शेख, नंदलाल मालपाणी, रवींद्र खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दीपक गिºहे यांनी आभार मानले.