महिना उलटूनही महानिरीक्षकपदाला अधिकाऱ्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:57+5:302021-06-04T04:12:57+5:30
नाशिक परिक्षेत्रात अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचाही समावेश होतो. नाशिक परिक्षेत्राची भौगोलिक सीमा अत्यंत मोठी आहे. यामुळे लवकरात ...
नाशिक परिक्षेत्रात अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचाही समावेश होतो. नाशिक परिक्षेत्राची भौगोलिक सीमा अत्यंत मोठी आहे. यामुळे लवकरात लवकर शासनाने या परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदावर स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिघावकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्याने ते महिनाभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. दरम्यान, या पदावर कोणाची नियुक्ती होते, याबाबत पोलीस वर्तुळात खलबते सुरू झाली हाेती. दरम्यान, मकरंद रानडे, सोलापूरचे आयुक्त अंकुश शिंदे आणि मुंबई वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांच्या नावांची जोरदार चर्चा होत होती तसेच कैसर खालिद यांचेही नाव नंतर चर्चेत पुढे आले; मात्र मागील काही दिवसांपासून नाशिकला काही वर्षांपूर्वी उपायुक्तपदी सेवा बजावणारेे रानडे यांच्या नावाचीच अधिक चर्चा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र २०१४ साली पडवळ यांनीही नाशिकच्या अधीक्षकपदाची धुरा सांभाळली होती. सुमारे दोन वर्षे त्यांनी या पदाची धुरा सांभाळल्याने त्यांचीही या पदावर वर्णी लागण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या गृहखात्याकडून या पदासाठी कोणाची नियुक्ती कधी केली जाते या शासन आदेशाकडे आता पाचही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
---
===Photopath===
030621\03nsk_62_03062021_13.jpg
===Caption===
मकरंद रानडे व प्रवीण कुमार पडवळ