ओझरखेड, तिसगाव धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:25 PM2019-08-01T14:25:11+5:302019-08-01T14:26:28+5:30

वणी: दिडोरी तालूक्यातील सहा धरणापैकी चार धरणामधे समाधानकारक पाणी साठा झाला असला तरी ओझरखेड धरणात अत्यल्प तर तिसगाव धरणात शुन्य टक्के जलसाठा अशी स्थिती असल्याने या भागातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

   Waiting for rain in Ozarkhed, Tisgaon Dam dam area | ओझरखेड, तिसगाव धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

ओझरखेड, तिसगाव धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे दिंडोरी :तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ


वणी: दिडोरी तालूक्यातील सहा धरणापैकी चार धरणामधे समाधानकारक पाणी साठा झाला असला तरी ओझरखेड धरणात अत्यल्प तर तिसगाव धरणात शुन्य टक्के जलसाठा अशी स्थिती असल्याने या भागातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. दिंडोरी तालुक्यात करंजवण, पुणेगाव, वाघाड, पालखेड या धरणांच्या जलसाठ्यात पावसामुळे वाढ झाली आहे. काही धरणात पन्नास टक्यापेक्षा अधिक तर काही धरणामधे तुलनात्मक कमी जलसाठा आहे. दरम्यान ओझरखेड धरणात या धरणांच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा तर तिसगाव धरणात शुन्य आशी स्थिती आता आहे. वणी दिंडोरी रस्त्यावरील वणी पासुन पाच कीलोमीटर अंतरावर असलेल्या ओझरखेड धरणातुन चांदवड तालूक्यातील छत्तीस गावांमध्येपाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित आहे. वणी शहराला पाणीपुरवठा या धरणातुन करण्यात येता.े लखमापुर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याना पाणीपुरवठा नियमानुकुल करण्यात येतो. तसेच पाणी वापर संस्था या धरणातील पाण्याचा वापर करतात सप्तशृंग गडावरील पर्वतरांगातील पावसाचे काही भागातील पाणी तसेच पायथ्याशी असलेल्या नद्या नाले आहीवंतवाडी, भातोडे व परीसरातील भुभागावरील नद्या, नाल,े औहोळ तसेच ओझरखेड धरणात विविध स्त्रोताद्वारे जाणारे पाणी तसेच वणी भागातील देवनदी यातुन पावसाचे पाणी प्रामुख्याने धरणात जाते. पाऊस या भागात बरसतो आहे. मात्र दमदार व जोमदार पावसाची व अखंडित पडणाऱ्यामोठ्या पावसाची गरज आहे. जेणेकरु न धरणातील जलसाठ्याच्या पातळीत वाढ होईल दरम्यान पुणेगाव धरण पुर्ण क्ष मतेने भरल्यानंतर त्यातील जलसाठा ओझरखेड धरणात सोडण्यात येतो तेव्हा ओझरखेड धरण भरते आसा प्रतिवर्षी चा अनुभव सध्यस्थितीत पुणेगाव धरणात सुमारे पन्नास टक्के जलसाठा आहे.यात मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात जाण्यासाठीच्या पर्यायी व्यवस्थेमुळे पुणेगाव धरण लवकर भरु न ओझरखेड धरण भरण्यासाठी च्या आशा जिवंत आहेत. साधारण: डिसेंबर महीन्याच्या अंतिम सत्रा पासुन ओझरखेड धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा येवला व लगतेचे तालुके करतात कारण त्यावेळी शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते.त्यामुळे ओझरखेड धरणावर पाणीपुरवठ्याचा प्रचंड ताण पडतो. तसेच दिंडोरी शहरासाठी पाणीपुरवठ्याचे काम या धरणातुन करण्यासाठी ची योजना अंतिम टप्यात आहे. अशा नियोजनाचा विचार करता ओझरखेड धरण पुर्ण क्ष मतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. पिण्यासाठी पाणी शेती उद्योग आसा पाणी वापराचा क्र म असला तरी ऐनवेळी परिस्थिती जन्य निर्णय घेताना प्रशासकीय व्यवस्थेला तारेवरची कसरत पिण्यासाठी पाणी आरक्षीत ठेवुन करावी लागते. दरम्यान वणी खेडगाव रस्त्यावरील तिसगाव धरणाची क्षमता इतर धरणांच्या तुलनेत कमी असली तरी मृतप्राय स्थिती जलसाठ्याची असल्याने याही पाणलोट भागात मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.  

 

 

Web Title:    Waiting for rain in Ozarkhed, Tisgaon Dam dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.