राजापूर येथे पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 09:23 PM2019-09-03T21:23:49+5:302019-09-03T21:24:05+5:30
राजापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी राजापूर गावासह पुर्वकडील भागातील पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या भागात ...
राजापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी राजापूर गावासह पुर्वकडील भागातील पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या भागात पाऊस नसल्याने विहिरी कोरड्याच आहेत. शिवाय गावातील टॅँकर बंद झाल्याने वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाइला सामोरे जावे लागत आहे.
राजापूर गावात चारही बाजूला टप्प्याटप्प्याने पेरण्या झालेल्या आहे. गाव परिसरात काही पिके मोठी तरी काही एकदमच छोटी आहे. राजापूर, पन्हाळसाठे, भैरवनाथवाडी पर्यंत पिके आजही मोठे आहे. राजापूर गावापासून वडपाटी सोमठाण जोश या ठिकाणी पिके पाण्यावर आली आहे. परंतू विहिरीना पाणी नाही.
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खते घेऊन खरीपाची पिके केले. सध्या रिमझिम पाऊस सुरू असला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने राजापूर सोमठाण जोश सोयगाव लोहशिंगवे आदी परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने छोटे-मोठे पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन महिने झाले तरी पाणी टंचाई कायम आहे. पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील सर्वात उंचावर असलेले गाव म्हणजे राजापूर. येथे कूठल्याही सिंचनाची सुविधा नाही.
राजापूर व तेथील वाड्या-वस्त्या या कायमच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. मागच्या वषीॅच्या जून महिन्यापासून पिण्यासाठी टँकर सुरू झालेले आहे. आता दुसºया वर्षाचा आता सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही पाऊस दमदार झालेला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा समस्या गंभीर होत चालली आहे. आता फक्त दोनच नक्षत्र शिल्लक असल्याने शेतकरीवर्ग दमदार पाऊसाची वाट पाहत आहे.