बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 11:13 PM2021-07-05T23:13:11+5:302021-07-06T00:19:01+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून, परिसरातील शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
ठळक मुद्देकाही शेतकरीवर्गाने अद्याप पेरणी केली नाही.
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून, परिसरातील शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
काही शेतकऱ्यांनी मका, बाजरी, सोयाबीन पेरणी केली तर काही शेतकरीवर्गाने अद्याप पेरणी केली नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात काही भागात पावसाने हजेरी लावली होती तर काही भागात पावसाने अद्याप हजेरी लावली नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून, परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत. काही भागातील शेतकरीवर्गापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.