नांदुर्डी-निफाड रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:37 AM2018-08-24T01:37:40+5:302018-08-24T01:37:55+5:30

नांदुर्डी : निफाड तालुक्यातील नांदुर्डी-निफाड या सहा कि.मी. अंतराच्या रस्त्याची दोन-तीन वर्षांपासून दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अर्धवट स्थितीतील रस्ता कामामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Waiting for repair of Nandurdi-Nifed road | नांदुर्डी-निफाड रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

नांदुर्डी-निफाड रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देगैरसोय : नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

नांदुर्डी : निफाड तालुक्यातील नांदुर्डी-निफाड या सहा कि.मी. अंतराच्या रस्त्याची दोन-तीन वर्षांपासून दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अर्धवट स्थितीतील रस्ता कामामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नांदुर्डी हे निफाड तालुक्यापासून अवघ्या सहा कि.मी. अंतरावरील मध्यवर्ती गाव आहे. परिसरातील कुंभारी, रानवड कारखाना, रानवड, सावरगाव, रेडेगाव, नांदूर, पालखेड, खडकजांब येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नांदुर्डी-निफाड हा एकमेव जवळचा रस्ता आहे. याचमार्गाने परिसरातील शेतकरी आपला शेतमाल निफाड बाजार समितीत विक्रीसाठी नेतात; परंतु सदर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने व मातीच्या असलेल्या रस्त्यावर जागोजागी चिखल साचल्याने नागरिकांना पायी चालणे व वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्याचे एक कि.मी. पर्यंतचे काम जिल्हा परिषदेच्या मंदाकिनी बनकर यांनी मार्गी लावले असून, उर्वरित पाच कि.मी. रस्त्याचे काम निधीअभावी रखडले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक व शेतकºयांची गैरसोय होत आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी सदर रस्त्याच्या दुरु स्तीसाठी तत्काळ पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.केवळ आश्वासने...परिसरातील उमेदवार केवळ निवडणूक काळात आश्वासने देतात, मात्र रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Waiting for repair of Nandurdi-Nifed road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.