नाशिक वनपरिक्षेत्राला ‘आरएफओ’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:02 AM2019-05-21T01:02:57+5:302019-05-21T01:03:15+5:30

वनविभाग पश्चिम अंतर्गत येणारे नाशिक वनपरिक्षेत्र मागील आठ महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) प्रतीक्षेत आहे.

 Waiting for 'RFO' to Nashik forest range | नाशिक वनपरिक्षेत्राला ‘आरएफओ’ची प्रतीक्षा

नाशिक वनपरिक्षेत्राला ‘आरएफओ’ची प्रतीक्षा

Next

नाशिक : वनविभाग पश्चिम अंतर्गत येणारे नाशिक वनपरिक्षेत्र मागील आठ महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) प्रतीक्षेत आहे. प्रशासकीय गलथान कारभारामुळे या रिक्त पदावर अद्याप स्वतंत्ररीत्या अधिकारी नियुक्त करण्यास वनविभागाला यश आलेले नाही. शहरी भागाचा समावेश असलेल्या नाशिक परिक्षेत्र अतिसंवेदनशील मानले जाते. यामुळे या परिक्षेत्राकरिता स्वतंत्र ‘आरएफओ’ची गरज भासते. येथील स्वतंत्र आरएफओ यांची सामाजिक वनीकरण विभागात बदली होऊन तेथे ते रुजू होऊन आठ महिने उलटले आहे तरीदेखील येथील पद रिक्त असून, प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.
बिबट्याचा लोकवस्तीत प्रवेश असो किंवा गांडूळपासून मगरीच्या पिलांच्या तस्करीपर्यंतचे गुन्हे नाशिक परिक्षेत्रांतर्गत घडल्याचा मागील इतिहास आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राची हद्दही मोठी असून, शहरी भागासह शहराजवळच्या खेड्यांचाही यामध्ये समावेश होतो. यामुळे उसाची शेती असलेला मळे परिसरदेखील भरपूर प्रमाणात आहे. यामुळे बिबट्याचा नागरी वस्तीत अधिवास, पशुधनावर हल्ल्यासह नागरिकांना जखमी करण्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. तसेच मोर, गिधाड, तरस, रानमांजर यांसारखे वन्यजीवदेखील अनेकदा जखमी अवस्थेत या परिक्षेत्रात आढळून येतात. एकूणच परिक्षेत्रामधील घटना घडामोडी वेगवेगळ्या प्रकारच्या असून या भागासाठी स्वतंत्ररीत्या वनपरिक्षेत्र अधिकारी तत्काळ नियुक्त करण्याची गरज आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांची सामाजिक वनीकरण विभागात बदली होऊन आठ महिने झाले आहे, तरीदेखील अद्याप त्यांच्या रिक्त पदावर स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला गेला नाही.
स्वतंत्र परिक्षेत्र अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायम
पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) हे महत्त्वाच्या पदाचा कार्यभार मागील आठ महिन्यांपासून ननाशी परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विभागाचे कार्यालय शहरात व ननाशीचा परिसर येथून सुमारे दीड तासाच्या अंतरावर आहे. मागील आठ महिन्यांपासून स्वतंत्र परिक्षेत्र अधिकाºयांची प्रतीक्षा कायम आहे.
थकबाकीदारांची यादी
त्यासाठी महापालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, यात पाच हजार ते नऊ हजार ९९९ रु पयांपर्यंतचे थकबाकीदार २०,०३४, १० हजार ते १४,९९९ रु पयांचे थकबाकीदार १०,६७७, १५ हजार ते २४,९९९ रु पयांपर्यंतचे थकबाकीदार ५०३३ व २५ हजार रु पयांच्या वरील थकबाकीदार १९९७ अशी थकबाकीची स्थिती आहे. सामान्यत: महापालिकेत डिसेंबर महिन्यापासून थकबाकी वसुली मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मात्र नव्या आर्थिक वर्षाच्या शुभारंभानंतरही मोहीम राबविली जात आहे.

Web Title:  Waiting for 'RFO' to Nashik forest range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.