पोटनिवडणुकीसाठी सातपूरकरांची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:25 PM2018-11-14T23:25:45+5:302018-11-14T23:26:03+5:30

महापालिकेच्या सातपूर प्रभागातील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांच्या आकस्मिक निधनानंतर अद्यापही पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे,

Waiting for Satpurkar for by-election | पोटनिवडणुकीसाठी सातपूरकरांची प्रतीक्षाच

पोटनिवडणुकीसाठी सातपूरकरांची प्रतीक्षाच

Next

नाशिक : महापालिकेच्या सातपूर प्रभागातील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांच्या आकस्मिक निधनानंतर अद्यापही पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे, परंतु चार महिने झाले तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.  सातपूर प्रभाग क्रमांक १० मधील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांचे चार महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे ही एक जागा सध्या रिक्त आहे. यासंदर्भात महापालिकेच्या निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाला अहवालही पाठविला आहे, परंतु अद्याप निवडणुकीची तारीख घोषित केलेली नाही. दरम्यान, राज्यातील विविध महापालिका आणि नगरपालिकांमधील जात प्रमाणपत्र अवैधतेप्रकरणी सुमारे दीड हजार जागा रिक्त असून, या सर्व रिक्त जागांसाठी आता एकत्रित निवडणूक जाहीर होण्याची शक्यता महापालिकेच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

Web Title: Waiting for Satpurkar for by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.