दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:43 PM2018-07-10T23:43:38+5:302018-07-10T23:44:48+5:30
नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.
नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.
यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत पावसाने वेळेवर हजेरी लावून बळीराजाच्या चेहºयावर हसू फुलवलं. वरुणराजाच्या आगमनाने शेतकºयांनी खरिपाची पेरणी व विविध पिकांची लागवड सुरू केली. शेतात पेरणी केलेले पीक रिमझिम पावसावर उगवायला लागले.
कोवळे अंकुर जमिनीतून बाहेर पडण्यास सुरुवात होताच पावसाने अचानक डोळे वटारल्याने उगवणारे हे अंकुर सुकलेल्या व कडक झालेल्या मातीतून बाहेर पडण्याच्या आतच पावसाअभावी करपू लागल्यामुळे बळीराजा चिंतित सापडला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिके सध्या शेतातील मातीतून उगवत आहे, तर काही उगवले आहे.
तसेच लागवड केलेले कोबी, टमाटे, फ्लॉवर, मिरची आदी पिके सध्या शेतकºयांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात खरिपाचे हजारो एकर क्षेत्रातील पेरणी तसेच लागवड केलेल्या शेकडो एकरवरील विविध पिकांना पाण्याची सध्या नितांत गरज आहे. नायगाव खोºयात कोबी पिकाच्या सुमारे चाळीस हजाराच्या आसपास पुड्यांच्या रोपाची लागवड झाली आहे. एकशे ८५ रुपये दराने सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची लागवड केलेली रोपे सध्या पाण्याअभावी करपून जात आहे.पिके धोक्यात येण्याची शक्यताहजारो एकरवरील खरिपाचे पीक सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे कमी-अधिक प्रमाणात उगवत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर नायगाव खोºयासह संपूर्ण तालुक्यातील हजारो एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार हे नक्की. पावसाने हजेरी लावली नाहीतर शेतकºयांना लाखो रु पयांचे नुकसान होईल, असे चित्र सध्या आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाची लकीर दिसते. मात्र संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर नाहीच; पण पावसाचा थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंता व्यक्त करत दुसºया दिवसाची वाट पहातो.
यंदाही मी कोबी पीक घेण्यासाठी ३१ हजारांच्या १७० पुड्या बियाणाची लागवड केली. मात्र लागवडीनंतर रिमझिम पाऊसही गायब झाल्याने सध्या हे संपूर्ण पीक पाण्यावाचून शेतातच करपून गेले आहे. थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस झाला नाही तरी माझे खरिपाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.
- शरद आव्हाड,
शेतकरी, देशवंडी