ओतूर परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: August 29, 2016 12:09 AM2016-08-29T00:09:38+5:302016-08-29T00:21:54+5:30
ओतूर परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा
Next
ओतूर : परिसरात तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजाची दमदार पासवाची प्रतीक्षा कायम आहे. मघा नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. पूर्वा नक्षत्रात तरी जोरदार पाऊस येईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. रोज पावसाचे वातावरण तयार होते. मात्र पाऊस पडत नाही. सद्या वातावरणात उकाडा जाणवत आहे. परिसरातील नद्यांचा पूर ओसरू लागला आहे. परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हतबल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे त्यांनी खरीप पिकांना पाणी भरणे सुरू केले आहे. मार्कंड पिंप्री धरणाचे पूरपाणी पाट चारीने आर्जल पाझर तलावात सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)