शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची प्रतिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:00 PM2019-05-12T19:00:18+5:302019-05-12T19:00:43+5:30

शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Waiting for teachers for educational aid | शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची प्रतिक्षा कायम

शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची प्रतिक्षा कायम

Next
ठळक मुद्देशालार्थ आयडीसाठी शिक्षकांची अडवणूक शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी कायम स्वरुपी अधिकारी नेमण्याची शिक्षक संघटनांची मागणी

नाशिक :शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक अशी दोन पदे एकाच अधिकाºयाकडे असल्याने शिक्षकांची दुहेरी अडचण होत असून, शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकपदी त्वरित कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागात शालार्थ आयडीच्या सुमारे २ हजार २०० फाईली पेंडिंग होत्या. याविरोधात शिक्षक संघटनांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात आंदोलने, मोर्चे काढत त्यांची संख्या साडेचारशेवर आणली आहे. मात्र, नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून या फाईली मार्गी लावायला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने अधिकाºयांच्या कारभाराविषयी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून संशय घेतला जात आहे. या स्थितीत शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी कार्यालय, वेतन पथकाच्या कार्यालयाजवळ मध्यस्थांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद अजूनही रिक्त असून, या पदाचा कार्यभार सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे आहे. महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची बढती झाल्याने त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार उदय देवरे यांच्याकडे आहे. या दोन्ही पदांवर प्रभारी अधिकारी असल्याने शिक्षकांना त्यांच्या समस्यांविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
उपसंचालकांची करावी लागते प्रतीक्षा 
नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांतून शिक्षक त्यांच्या समस्या घेऊन येतात. मात्र, उपसंचालक भेटत नसल्याने शिक्षकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. तर शिक्षिकांसोबत लहान बाळेही सोबत असल्याने त्यांची हेळसांड होताना दिसते. शिवाय नाशिकपर्यंत येण्या-जाण्याचा खर्च करूनही अनेकदा उपसंचालकांची भेट होत नसल्याने शिक्षकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची तक्रार शिक्षकांमधून दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे.  

Web Title: Waiting for teachers for educational aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.