लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:43+5:302021-03-27T04:14:43+5:30

----- परीक्षेनंतर हाउसफुल्ल एप्रिल महिन्यात शाळा व महाविद्यालयांना परीक्षा संपल्यानंतर सुट्टी लागणार असल्याने बहुतांश प्रवाशांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले ...

Waiting for the train for the long haul journey | लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला वेटिंग

लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला वेटिंग

Next

-----

परीक्षेनंतर हाउसफुल्ल

एप्रिल महिन्यात शाळा व महाविद्यालयांना परीक्षा संपल्यानंतर सुट्टी लागणार असल्याने बहुतांश प्रवाशांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असून, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील आरक्षण हाउसफुल्ल झालेले आहे. सध्या होळी, धूलिवंदन सण असल्याने रेल्वेला गर्दी वाढली असून, आरक्षण सहजासहजी मिळणे अवघड झाले आहे.

चौकट=

लांबपल्ल्याला वेटिंग; मुंबईला उपलब्ध

नाशिकरोड रेल्वेस्थानकमार्गे मुंबई, नागपूर, नागपूरमार्गे कोलकाता, इटारसी, इटारसीमार्गे दिल्ली, इटारसीमार्गे जबलपूर, इलाहाबाद, बनारस, औरंगाबाद, केरळ एर्नाकुलम या मार्गावर रेल्वे धावतात. या सर्व मार्गांवरील लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण हाउसफुल्ल झालेले आहे.

-----------

मनमाडहून मुंबईला दररोज धावणारी पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस यांचे आरक्षण सहजरीत्या मिळत आहे; मात्र लांब पल्ल्याची मुंबईला जाणारी रेल्वे हिचे नाशिकरोडहून मुंबईला जाण्यासाठी आरक्षण मिळत नाही. सध्या कोरोनामुळे औरंगाबादच्या आजूबाजूचे जिल्हे लाॅकडाऊन करण्यात आल्याने औरंगाबादला जाणाऱ्या काही रेल्वेचे आरक्षण मिळत आहे.

चौकट===

मुंबईपासून नाशिक जवळ असल्याने मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वच रेल्वे नेहमी बहुतांशी वेळेला हाउसफुल्ल असतात. तसेच नाशिक हे धार्मिक स्थळ असल्याने त्याबरोबर त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी जवळ असल्याने नाशिकरोडमार्गे धावणाऱ्या रेल्वे या हाउसफुल्ल असतात. आर्टिलरी सेंटर नाशिकला असल्याने त्यामुळेदेखील रेल्वेला नेहमीच गर्दी असते.

-आर. के. कुठार

प्रबंधक, नाशिकरोड रेल्वेस्थानक

Web Title: Waiting for the train for the long haul journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.