दोन दिवस प्रतीक्षा : तलाठी वैतागलेसातबारा आॅनलाइनचे काम ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:57 AM2017-12-06T00:57:38+5:302017-12-06T01:03:17+5:30
नाशिक : महाआॅनलाइनच्या धीम्या गतीने चालणाºया सर्व्हरमुळे वैतागलेले तलाठी व मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या आठ दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले आहे. यासंदर्भात तातडीने हैदराबादच्या कंपनीशी संपर्क करून जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांचे युजर आयडी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आल्याने येत्या दोन दिवसात प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हरच्या गतीला कंटाळलेल्या तलाठी, मंडळ अधिकाºयांसाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून कामाला गती देण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक तलाठी, मंडळ अधिकाºयासाठी स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड देण्यात आलेला असताना, त्यात तांत्रिक दोष निर्माण झाला, परिणामी नाशिक तालुक्यातील तलाठ्यांसाठी देण्यात आलेला युजर आयडी संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी वापरू लागल्याने सर्व्हरवर ताण पडल्याने संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून संगणकीय सातबारा, इडीट मॉड्युलचे कामकाज ठप्प झाले. पुन्हा नव्याने युजर आयडीनागरिकांना सातबारा मिळण्यात अडचणी निर्माण होऊन फेरफार नोंदणीही बंद झाल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्याने त्याची दखल घेत त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाने सर्व तलाठ्यांना पुन्हा नव्याने युजर आयडी देण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी हैदराबादस्थित ‘नेक्सजेन’ कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.