‘त्या’ गावांना पाण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:56 AM2018-07-10T00:56:35+5:302018-07-10T00:56:47+5:30
दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
नाशिक : दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची चळवळ आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना यांनी सुरू केली आहे. महाराष्टÑ शासनाच्या जलयुक्त शिवाराचे सहकार्यही त्यांना लाभत आहे. सिन्नर तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र वडझिरे, धोंडबार आणि कोनांबे हिच गावे स्पर्धेत टिकली आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला होता. पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या व्यापक सहयोगातून या तीनही गावांमध्ये पाणी अडविण्यासाठीचे मोठे काम झाले आहे. नदी, ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, मातीबांध, दगडीबांध बांधण्याची किमया ग्रामस्थांनी करून दाखविली आहे. मात्र यंदा जुलै उजाडूनही पुरेसा आणि समाधानकारक पाऊस नसल्याने ग्रामस्थांना चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनावरच या गावांचे भवितव्य आणि गावकºयांच्या श्रमाचे मोल अवलंबून आहे.