सहकारी बँका, पतसंस्थांचे कर्ज माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:32 PM2019-01-01T18:32:41+5:302019-01-01T18:33:07+5:30
मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी कर्जमाफी देताना विदर्भातील ज्या शेतकºयांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकºयांचे कर्ज उदार अंतकरणाने माफ केले आहे. त्याच धरतीवर यंदा सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्याकडून शेतकºयांनी काढलेल्या कर्जाची माहिती मागवून शेतकºयांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
येवला : शेतकऱ्यांना नोटबंदीत मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागला, नंतर राज्यभरातील जिल्हा बँका डबघाईस आल्याने शेतकºयांच्या हालआपेष्टात भर पडली, त्यात दुष्काळाने कहर केला. अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांना कर्जमाफीच तारु शकते. मात्र कर्जमाफी देताना जिल्हा बँकेचे कर्ज माफ करण्याबरोबरच सर्व सहकारी बँका, पतसंस्था यांच्याकडून सातबारा देऊन घेतलेले कर्जही शासनाने माफ करावे, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी केली आहे.
शेतीसाठी भांडवल आवश्यक असल्याने शेतकºयांनी वेगवेगळे पर्याय वापरून शेतीसाठी भांडवल उभे केले. काही शेतकºयांनी सावकारांकडून तर काहींनी सहकारी नागरी बँका, सहकारी पतसंस्था यांच्याकडे आपल्या जमिनीचे सातबारा उतारे नजरगहाण ठेवून कर्ज काढले आहे. याची माहिती सहकारमंत्री व मुख्यमंत्री यांनाही आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी कर्जमाफी देताना विदर्भातील ज्या शेतकºयांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकºयांचे कर्ज उदार अंतकरणाने माफ केले आहे. त्याच धरतीवर यंदा सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्याकडून शेतकºयांनी काढलेल्या कर्जाची माहिती मागवून शेतकºयांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.