पेट्रोलसदृश ज्वलनशील द्रव्य ओतून वाजे यांना कारसह पेटविले मोटार नेली शहराबाहेर निर्जनस्थळी : पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 12:16 AM2022-02-04T00:16:39+5:302022-02-04T00:16:58+5:30
नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे मंगळवारी (दि.२५) दुपारनंतर रुग्णालयात मोटारीने गेल्या; मात्र त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. शिजविलेल्या कटाप्रमाणे संशयित संदीप वाजे याने त्यांचा काटा काढला. निर्जनस्थळी त्यांना मोटारीतून घेऊन जात साथीदारांसोबत संगनमताने ठार मारुन मोटारीसह पेट्रोलसदृश्य ज्वलनशील द्रव्य ओतून पेटवून दिल्याच्या धक्कादायक प्रकारावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

सुशिक्षित, उच्चभ्रू कुटुंब म्हणून कर्मयोगीनगर परिसरात ओळखल्या जाणाऱ्या वाजे दाम्पत्यामध्ये कलह पराकोटीला पोहोचला होता. बांधकाम व्यावसायिक असलेल्या संदीप वाजे याने पेशाने डॉक्टर असलेल्या स्वत:च्या पत्नीच्या खुनाचा पूर्वनियोजित कट रचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाजे यांची जळालेली मोटार व त्यामध्ये सापडलेली हाडे शहरापासून कोसोदूर आढळली. मुंबई महामार्गालगत लष्करी फायरिंग रेंजच्या प्रवेशद्वारासमोर जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर विविध प्रश्न उपस्थित झाले होते.
रासायनिक विश्लेषकाकडून मागविला अहवाल
वाजे यांची मोटार हेतूपुरस्सर जाळण्यात आल्याचे अग्नी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. रासायनिक विश्लेषकामार्फत पोलिसांकडून जळालेल्या अवशेषाचे नमुने पडताळणी करून घेतले जात आहेत. अद्याप रासायनिक विश्लेषकांचा अहवाल आलेला नाही. मोटार जाळण्यासाठी रासायनिक द्रव्यांचाही वापर केला गेला किंवा नाही? हे स्पष्ट होणार आहे.
कलह घटस्फोटापर्यंतही पोहोचला होता
मागील काही वर्षांपासून वाजे दाम्पत्यामध्ये होणारा वादविवाद व कलह घटस्फोटापर्यंतही जाऊन पोहोचला होता, असेही पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. साक्षीदारांची नोंदविलेली साक्ष, तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेले पुरावे, डीएनए चाचणी अहवाल आदींवरून पोलिसांनी अखेर वाजे बेपत्ता झाल्या नसून, त्यांचा खून करण्यात आला असल्याचे कळले.
खुनाचे पुरावे जाळले खरे, पण....?
संशयित संदीप वाजे याने संगनमताने काही साथीदारांच्या मदतीने स्वत:ची पत्नी सुवर्णा वाजे यांना ठार मारले. त्यांच्या खुनाचे सर्व पुरावे नष्ट व्हावेत आणि पोलिसांच्या तपासाला दिशा मिळू नये, म्हणून मोटारीसह वाजेंचा मृतदेह पेटवून दिला. या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करत ग्रामीण पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला.