नाशिकरोडला आरोग्य संवर्धनासाठी वॉकेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:51 AM2018-03-13T00:51:56+5:302018-03-13T00:51:56+5:30
आरोग्यासाठी पायी चाला, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा देत नाशिकरोडला वॉकेथॉन पायी चालण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली.
नाशिकरोड : आरोग्यासाठी पायी चाला, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा देत नाशिकरोडला वॉकेथॉन पायी चालण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून माहेश्वरी बहु मंडळ व शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५च्या मैदानावर ३ व ५ किलोमीटर पायी चालण्याची महिलांसाठी वॉकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वॉकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, मधुकर कड, नगरसेविका संगीता गायकवाड, माजी पोलीस अधिकारी रावसाहेब पोटे आदि मान्यवरांच्या हस्ते झाले. स्पर्धेमध्ये लहान मुलींपासून युवती, महिला, वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
विजेत्यांचा सत्कार
वॉकेथॉन स्पर्धेतील विजेत्या डॉ. पमिता सुराणा, डॉ. प्रांजल गांगुर्डे, ज्योती उगले, शिल्पा स्वान यांना सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, मधुकर कड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी ४२ किलोमीटर मॅरेथॉनमधील विजेत्या अश्विनी देवरे, २१ किलोमीटरच्या विजेत्या नलिनी कड, योगामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणाºया गीता ढाके, लॉन टेनिस खेळाडू नुपूर गुप्ता व स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा पूर्ण करणाºया ७४ वर्षीय वयोवृद्ध शैलजा शिंत्रे यांचादेखील पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वॉकेथॉन स्पर्धेसोबत मैदानावर आयोजित झुंबा डान्समध्ये महिलांनी सहभागी होत आनंद लुटला. वॉकेथॉन स्पर्धेमध्ये हजार-बाराशेहून अधिक युवती, महिला, वयोवृद्ध महिला, मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी निशा सोमाणी, अलका करवा, कविता राठी, दीपा बुब, वर्षा कलंत्री, सारिका करवा, श्रद्धा कासट, सीमा कासट, पूनम राठी, अवंती भुतडा, कविता लाहोटी, प्रीती बुब, धनश्री चांडक, अरुणा सूर्यवंशी, प्रीती ढोकणे, आशा गोडसे, अनिता पाटील, कांचन चव्हाण, नेहा खरे, शुभांगी सावजी, मनीषा गायकवाड, भक्ती शिंदे, सारिका सागर, विद्या सोनार, स्मिता पाळदे आदि उपस्थित होते.
सांस्कृतिक चळवळ वाढावी
नाशिकरोड परिसरामध्ये सांस्कृतिक चळवळ व सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग वाढावा या हेतूने शिखर स्वामीनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्तरातील महिलांचा मोठा सहभाग मिळाल्याने यापुढे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातील. - संगीता गायकवाड, नगरसेविका