उठा, उठा, दिवाळी झाली; शिक्षक पुरस्काराची वेळ आली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:33 AM2017-10-24T01:33:36+5:302017-10-24T01:33:42+5:30
मनपाच्या शिक्षण विभागाने यावर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मुहूर्त लाभू शकलेला नाही. विजयादशमीपूर्वीच सोहळ्याचे आयोजन करण्याची तयारी करणाºया मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाला आता दिवाळी संपली तरी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महापौरांची तारीख मिळू शकलेली नाही. दरम्यान, येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत मनपा शाळांना सुट्या असल्याने त्यानंतरच सोहळ्याला मुहूर्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक : मनपाच्या शिक्षण विभागाने यावर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मुहूर्त लाभू शकलेला नाही. विजयादशमीपूर्वीच सोहळ्याचे आयोजन करण्याची तयारी करणाºया मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाला आता दिवाळी संपली तरी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महापौरांची तारीख मिळू शकलेली नाही. दरम्यान, येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत मनपा शाळांना सुट्या असल्याने त्यानंतरच सोहळ्याला मुहूर्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मनपाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले होते. त्यात मनपा शाळांतील १३, तर खासगी शाळांमधील सात शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप त्याबद्दल काहीही हालचाल दिसून येत नसल्याने यंदाही मागील वर्षाप्रमाणे विलंब लागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी तत्कालीन शिक्षण सभापतीने आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी सदर सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांचाच हट्ट धरला होता. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला तब्बल साडेतीन महिने विलंब झाला होता. अखेर, पालकमंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर दि. २० डिसेंबरला सोहळा पार पडला होता. यंदा, शिक्षण विभागावर अद्याप समिती गठित झालेली नाही. सारा कारभार प्रशासनाधिकाºयाच्या हाती आहे. विजयादशमीपूर्वी सदर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्याची तयारी शिक्षण विभागाने चालविली होती शिवाय, त्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह निश्चित करण्याबरोबरच वितरण सोहळा महापौरांच्याच हस्ते करण्याचे योजिले होते. दसरा गेला, आता दिवाळीही संपली परंतु, अद्याप पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त लाभू शकलेला नाही. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शिक्षण विभागाने महापौरांकडे तारीख मागितली आहे आणि तसे पत्रही महापौर कार्यालयाला दिले आहे. परंतु, अद्याप महापौरांकडून तारीख मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. महापालिकेच्या शाळांना दि. ५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या आहेत. त्यामुळे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणखी पंधरा दिवस लांबण्याची शक्यता आहे.
शिक्षकांची उपेक्षा
मनपा शिक्षण विभागाकडून नेहमीच शिक्षकांची उपेक्षा होत आलेली आहे. त्यात निवृत्त शिक्षकांचीही परवड सुरूच आहे. दरवर्षी शिक्षक पुरस्कारांना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवरून वितरण सोहळ्याला विलंब केला जातो. मागील वर्षी पालकमंत्र्यांच्या तारखेसाठी पुरस्कार रखडले होते. यंदा महापौरांच्या तारखेसाठी पुरस्कारांचे वितरण थांबले आहे. शिक्षण विभागाने राजकीय पुढाºयांच्या हस्ते वितरणाचा सोहळा पार पाडण्याऐवजी साहित्यिक व वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करावे, असा एक मतप्रवाह शिक्षकांमधूनच आहे.