वाकी खापरी ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:05 PM2017-08-01T23:05:57+5:302017-08-02T00:12:27+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी नदीवरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्ण झाले आहे.

Waki Khapri 'Overflow' | वाकी खापरी ‘ओव्हरफ्लो’

वाकी खापरी ‘ओव्हरफ्लो’

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी नदीवरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या अठरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा विरोध, भूसंपादन, पुनर्वसन आदी कारणांसह निधीच्या तुटवड्यामुळे रखडलेले हे धरण यावर्षी पूर्ण झाल्याने जलसंपदा विभागासह शेतकºयांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान या वर्षी धरणात पाणी साठा करण्यात आल्याने या भागातील शेतीच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे. यामुळे या भागातील शेतकºयांनी समाधान व्यक्त करीत धरणाच्या अधिकाºयांचे कौतुक केले आहे. या धरणावर या वर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असल्याने नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव, वाकी खापरी धरणाचे सहाय्यक अभियंता हरिभाऊ गिते, शाखा अभियंता गोकुळ पिळोदेकर, स्वप्निल पाटील, लक्ष्मण खताळे, कचरूराव, विठ्ठल खाडे, सुनील गायकवाड आदींसह जलसंपदा विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. वाकी खापरी धरण घोटी-वैतरणा- त्र्यंबकेश्वर मार्गावर असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.





————————-
वाकी खापरी धरणाचे काम पूर्णत्वाकडे असतांना ह्या भागात काम करून धरण भागात मोठ्या प्रमाणावर ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. शेतीव्यवसायासह या भागाला नवसंजीवनी देणारे हे धरण लोकांच्या कौतुकाला पात्र ठरले. प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी जे जे करता येणे शक्य होते ते सर्व करण्याचा प्रामाणकि प्रयत्न केला.
- हरिभाऊ गीते, सहाय्यक अभियंता श्रेणी ? वाकी खापरी धरण
——————-
गेली अनेक वर्षापासून केवळ पारंपरिक भात पिकावर अवलंबून राहिलेल्या या भागातील शेतकर्यांना हे धरण संजीवनी देणारे ठरणार आहे.हंगामी पिकावर भिस्त न ठेवता धरणातील पाण्याच्या भरवश्यावर आधुनिक पिके,नगदी पिके घेण्यावर आमचा कल वाढला असल्याने अनेक शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.हे धरण आमच्या भागातील शेतकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आण िसिंचनासाठी वरदान ठरले आहे.
- संजय शिंदे,शेतकरी
———————-
दृष्टीक्षेपात वाकी खापरी धरण
धरणाचा प्रकार - माती धरण
आजचा पाणीसाठा - १६५५ द.ल.घ.फू.
धरण क्षेत्रातील पाऊस - १९१० मी. मी.
एकूण क्षमता - २६८० द.ल.घ.फू.
संपादीत जमीन - १०२७ हेक्टर
धरणाची उंची - ३३ मीटर
धरणाची लांबी - १०५० मीटर
धरण सांडवा लांबी - ४१ मीटर
दरवाजे संख्या - तीन वक्र ाकार दरवाजे
——————
(0१ घोटी १/२)

Web Title: Waki Khapri 'Overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.