वाड्याची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:23 AM2019-07-02T01:23:59+5:302019-07-02T01:24:16+5:30
जोरदार पावसामुळे सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील जोगवाडा भागात एका बंद वाड्याची भिंत कोसळली. या घटनेत दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. वाडा बंद असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
नाशिक : जोरदार पावसामुळे सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील जोगवाडा भागात एका बंद वाड्याची भिंत कोसळली. या घटनेत दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. वाडा बंद असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच मुख्यालयातील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. बंबचालक देवीदास इंगळे, फायरमन, किशोर पाटील, तौसीफ शेख, राजेंद्र पवार, विजय शिंदे, नदीम देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना सतर्क तेच्या सूचना केल्या. स्थानिक युवक नदीम मनियार, जोएब शेख, मुदस्सर सय्यद, शादाब अन्सारी यांनीही अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली.
जुने नाशिक परिसरात धोकादायक वाड्यांची संख्या अधिक असून महापालिकेकडून यंदाही नोटीसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहे़ गेल्या वर्षी जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळून दोघा युवकांना आपले प्राण गमवावे लागले होते़ तसेच शुक्रवारी सकाळी संभाजी चौकात वाडा कोसळून तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती़
भिकुसा गल्लीतही ढासळली भिंत
मेनरोड परिसरातील भिकुसा गल्लीत असलेल्या एका जुन्या वाड्याच्या भिंतीचा काही भाग सायंकाळच्या सुमारास पावसाने ढासळला़ सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही़ घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत पाहणी केली़
४त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलच्या संरक्षक भिंतीचा काही भाग सोमवारी कोसळला़ संरक्षक भिंतीच्या आतमध्ये असलेले झाड उन्मळून भिंतीवर पडले त्यामुळे भिंतीचा काही भाग ढासळला़