नाशकात वाड़्याची भिंत रीक्षावर कोसळली ; रीक्षाचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:18 PM2019-07-28T13:18:31+5:302019-07-28T13:21:07+5:30

नाशिक शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

The wall of the castle collapses on the wall; The conductor was injured | नाशकात वाड़्याची भिंत रीक्षावर कोसळली ; रीक्षाचालक जखमी

नाशकात वाड़्याची भिंत रीक्षावर कोसळली ; रीक्षाचालक जखमी

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये पुन्हा वाडा कोसळलापवार वाड्य़ाची भिंत कोसलून एक जखमी रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

नाशिक : शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
पंचवटी भागातील  सुकेनकर लेनमध्ये  सोन्या मारुती मंदिराजवळील जीर्ण झालेला पवार वाडा अखेर रविवारी (दि.28) दुपारी बारा वाजताच्या सुमारास कोसळला. नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊंस सुरू या  पावसामुळे शहरात पुन्हा एक वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाड्याची भिंत कोसळल्याने वाड्याबाहेर उभी असलेली रिक्षा दबली गेली आहे. या रीक्षामध्ये बसलेला रीक्षाचालक कृष्णांत कपीलकाची या घटनेत जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, वाडा कोसळण्याची माहिती मिळताच पंचवटी विभागाच्या अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत वाड्यातील रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. यात घरमालक  अंकूश पवार यासह रहिवाशी बबन शिरसाठ, अंडना कपील काची, कामीनी धायजे, सदानंद दुसाने, नागेश आव्हाड, शारदा चौधरी आदींचा समावेश असल्याची माहिती अग्नीशमन दलातील सुत्रांनी दिली आहे. 

Web Title: The wall of the castle collapses on the wall; The conductor was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.