गिरणारेत उभी राहिली माणूसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:59 PM2020-02-08T22:59:03+5:302020-02-09T00:27:52+5:30
नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावातील तरुणांनी याकामी पुढाकार घेऊन, परिसरातील गरीब व गरजवंत यांनी आपल्या मापाचे जुने कपडे घेऊन जात आहेत.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावातील तरुणांनी याकामी पुढाकार घेऊन, परिसरातील गरीब व गरजवंत यांनी आपल्या मापाचे जुने कपडे घेऊन जात आहेत.
गिरणारे येथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी खेड्यातून मजूर व कष्टकरी शेतीकामासाठी मुक्कामी १५ ते २० दिवस येत असतात. त्यांना कपड्यांची गरज भासते ही अडचण दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न नितीन गायकर व मित्रपरिवार यांनी केला. गावातून जवळपास १५०० ते २००० हजार कपडे संकलन करून या माणूसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील सर्व प्रकारचे विनावापर कपडे फेकून न देता ते माणूसकीच्या भिंतीवर आणून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी गावच्या सरपंच अलकाताई दिवे, निवृत्ती घुले, बाळकृष्ण हंडोरे, आत्माराम थेटे, मंजूळताई गायकर, छबाबाई थेटे, अंजना लिलके, प्रवीण कोरडे, सुभाष खैरनार, संजय सूर्यवंशी, शंकर थेटे आदी उपस्थित होते.
गावातील काही तरुणांनी घराघरांत जाऊन नागरिकांकडून विनावापरत असलेल्या सर्व प्रकारचे कपडे गोळा करून गिरणारेच्या चौफुलीवर एक ‘माणूसकीची भिंत’ अशी पाटी लावून त्यावर जुने कपडे अडकविण्यात आले आहेत.