नद्यांना भिंत म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:41 AM2021-07-29T01:41:38+5:302021-07-29T01:42:16+5:30
राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.
नाशिक : राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.
मिशन नाशिक महापालिकेसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे बुधवारी (दि. २८) नाशिकच्या दौऱ्यावर आले असून, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना देशपांडे यांनी राज्य सरकाच्या भिंत प्रकरणाची खिल्ली उडवली. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्यावर पुतळा उभारण्यात येेणार होता. तो पुतळा उभारू शकले नाहीत आणि भिंत काय उभारणार, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांनी अगोदरच गड, किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले होते, असेही ते म्हणाले.
काेकणातील पुराच्या विषयावर बोलताना देशपांडे म्हणाले, हे प्रशासनाचे फेल्युअर आहे. कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना दिले नाहीत. निक्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्याने नियोजन नाही की, मदत करण्याची एसओपी तयार नव्हती. तसेच आता मदत घोेषित केली तरी पॅकेज जाहीर करून उपयोग नाही, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.
इन्फो...
शिवसेनेची आधी, जाहिरात मग मदत
शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत केली. त्यावर बोलताना आधी जाहिरात केली, मग मदत केली, असा टोला लगावून मनसे शंभर ते सव्वाशे ट्रक मदत करत असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.