दिव्यांगांसाठी फिरता दवाखाना कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:49 PM2018-01-28T23:49:58+5:302018-01-29T00:09:20+5:30
महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना वैद्यकीय सेवा तत्काळ पोहोचावी यासाठी फिरता दवाखाना तयार केला असून, या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना वैद्यकीय सेवा तत्काळ पोहोचावी यासाठी फिरता दवाखाना तयार केला असून, या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. अपंगांसाठी राखीव तीन टक्के निधीतून दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत दिव्यांगांसाठी फिरता दवाखाना तयार करण्यात आला आहे. उपचाराची गरज भासणाºया दिव्यांगांनी सदर फिरत्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१२२) व वाहनचालक यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१३३) या क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत फिरता दवाखाना पोहोचणार आहे. या दवाखान्याचे उद्घाटनप्रसंगी आयुक्त अभिषेक कृष्ण, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, मनसे गटनेता सलीम शेख, पश्चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते.