वणीत बाजार बंद

By admin | Published: June 2, 2017 12:50 AM2017-06-02T00:50:50+5:302017-06-02T00:51:02+5:30

वणी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन बाजार बंद होता,

Wanat market closed | वणीत बाजार बंद

वणीत बाजार बंद

Next


वणी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन बाजार बंद होता, तर खेड्यापाड्यावरून दूध विक्रेते व भाजीपाला विक्रेते शहरात न आल्याने तारांबळ उडाली होती. शेतकऱ्यांनी आजपासून मागण्या मान्य होण्यासाठी संपाचे हत्यार उपसले असून, दैनंदिन गरजेसाठी लागणारे दूध व भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरून दैनंदिन बाजारात आज भाजीपाला, फळे, दूध विक्रेते आले नाहीत. त्यामुळे बाजारतळावर शुकशुकाट होता. तसेच वणी - पिंपळगाव रस्त्यावर भरणाऱ्या बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. वणी - सापुतारा, वणी-कळवण रस्त्यावर जमलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व दुधाची वाहतूक करणारी वाहने अडवून निषेध व्यक्त केला. वणी अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनने या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दुकानातील व्यवहार पूर्णत: बंद ठेवले.





 

Web Title: Wanat market closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.