गणेशोत्सवाची आरास शोधण्यासाठी मंडळांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:26 AM2019-07-29T00:26:12+5:302019-07-29T00:26:34+5:30

नाशिक शहर  परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे.

 Wander the circles to find the outfit of Ganeshotsav | गणेशोत्सवाची आरास शोधण्यासाठी मंडळांची भटकंती

गणेशोत्सवाची आरास शोधण्यासाठी मंडळांची भटकंती

Next

नाशिकरोड : नाशिक शहर  परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे.
नाशिक शहरातील जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड आदी भागांमध्ये काही वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तेव्हा भोईर, लोंढे, तांबट, गर्गे, नाशिकरोडला चंदू भावसार आदी मूर्तिकार मंडळांची आरास, देखाव्यांची गरज भागवत होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवस देखावे सादर केल्यानंतर मित्रमंडळांकडून सदरचे देखावे वर्षभर सांभाळून ठेवले जात व पुढच्या वर्षी त्याची रंगरंगोटी करून एकतर दुसºया मंडळाला वापरण्यासाठी देत किंवा त्याची कमी-अधिक पैशात विक्री केली जात होती. परंतु अलीकडे शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर जुन्या मंडळांना त्यांची पूर्वापार असलेली गणेशोत्सवाची जागाच राहिली नाही. त्यातच वर्गणीची रक्कम पाहिजे त्या प्रमाणात जमा होत नसल्याने गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडू लागले. परिणामी गणेशोत्सव साजरा करण्यात मंडळांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरविले. याशिवाय मंडळांना आर्थिक हातभार लावणारी ‘नाल’ पोलिसांकडून बंद करण्यात आल्याने काही मंडळांनी कायमचेच थांबून घेतले.
अशाही परिस्थितीत शहरातील काही मंडळांनी आपली गणेशोत्सवाची परंपरा टिकवून ठेवली. छोट्या-मोठ्या प्रमाणत का होईना त्या मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू ठेवला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात सुरेश भोईर, निनाद भोईर, चंदू भावसार व सिडकोमध्ये असलेले मूर्तिकार असे बोटावर मोजण्याइतकेच मूर्तिकार शिल्लक राहिल्याने शहरातील मंडळांना देखावे, आरास घेण्यासाठी परजिल्ह्यात भटकंती करण्याची वेळ आली आहे. आरास, देखावे मिळत नसल्याने काही मंडळांकडून आकर्षक मंडप व मोठी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे गणेशोत्सवातून दिला जाणारा सामाजिक, धार्मिक, देशभक्ती आदी प्रकारचा संदेश लोप पावत चालला आहे.
शहरातील मूर्तिकार कलाकारांकडे जागेची आर्थिक अडचणी सोबत सर्वांत महत्त्वाचे कारागिरांची अडचण नेहमीच राहिल्याने नाशिक शहरात हा व्यवसाय गणपती, नवरात्री या उत्सवापुरताच मर्यादित राहिला. वर्षभर व्यवसायाचे नियोजन करणे विविध कारणामुळे अडचणीचे ठरल्याने अनेक मूर्तिकार, कलाकारांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला किंवा देखावे, आरास बनविणे बंद करून टाकले. यामुळे शहरातील मंडळांना गणेशोत्सवासाठी आरास, देखावे, मोठ्या गणपतीच्या मूर्त्या घेण्यासाठी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, पुणे, नगर, उरळीकांचन आदी भागात भटकंती करावी लागत आहे.
फायबरमधील देखावे, आरासला मागणी
मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नगर आदी भागांतील व्यावसायिक मूर्तिकारांनी फायबर मोल्ंिडगमध्ये भव्यदिव्य देखावे, आरास, मोठ्या मूर्ती बनविल्या आहेत. मूर्तींचे वेगवेगळे भाग बनवून आरास, देखावे, मोठ्या मूर्ती बनविल्याने ते पुन्हा ठेवणे सोपे जाते. फायबर मोल्ंिडगमध्ये बनविल्याने त्यांना आयुष्यदेखील मोठे आहे. व्यवस्थित तांत्रिक मदत घेऊन बनविलेले देखावे, आरास, मूर्ती खर्चिक असली तरी ती अनेक वर्षे टिकत असल्याने व्यावसायिक मूर्तिकारांना आर्थिक फायदादेखील होत आहे. त्यामुळे बहुतांश सार्वजनिक मंडळे भाडेतत्त्वावर देखावे, आरास घेतात. शहरातील बहुतांश मंडळांचा परजिल्ह्यातून देखावे, आरास आणण्यावर भर आहे.
४गणेशोत्सव साजरा करण्यात मंडळांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरविले. याशिवाय मंडळांना आर्थिक हातभार लावणारी ‘नाल’ पोलिसांकडून बंद करण्यात आल्याने काही मंडळांनी कायमचेच थांबून घेतले.
वडील नेताजी भोईर यांनी नफा-तोटा न बघता मूर्तिकार म्हणून देखावे, आरास, मूर्ती बनविण्याचे काम केले. पारंपरिक व्यवसाय असल्यामुळेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पैसे कमविणे हे उद्दिष्ट न ठेवता काम करत आहे. व्यावसायिक मूर्तिकार न होता आजही देखावे, आरास, मूर्ती बनविण्याचे काम सुरू ठेवले आहे.
- सुरेश नेताजी भोईर, मूर्तिकार, पंचवटी
देखावे, आरास, मोठ्या मूर्ती बनविल्यावर त्या कष्टाप्रमाणे पैसे मिळत नाही. सर्वांत मोठी अडचण कारागिरांची आहे. काही आरास, देखाव्याचे पूर्ण पैसे मंडळाकडून मिळाले नाही. जागा व आर्थिक पाठबळाचीदेखील अडचण या सर्व बाबींचा विचार करून दहा वर्षांपूर्वीच आरास, देखावे बनविण्याचे काम बंद करून मूर्तिकार म्हणून काम करत आहे.
- संजय तुळशीराम घुले, मूर्तिकार, इंदू लॉन्स,औरंगाबादरोड

Web Title:  Wander the circles to find the outfit of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.