घोटी परिसरात पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:56 PM2018-12-12T17:56:38+5:302018-12-12T17:56:48+5:30
घोटी: विक्र मी पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफलो हे घडणार्या एकमेव इगतपुरी तालुक्यात मात्र पंचायत समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची केविलवाणी वेळ आली आहे.
घोटी: विक्र मी पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफलो हे घडणार्या एकमेव इगतपुरी तालुक्यात मात्र पंचायत समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची केविलवाणी वेळ आली आहे. चहूबाजूला धरणे,या धरणामुळे तालुक्याला भेदून जाणाऱ्या भाम,वाकी खापरी व दारणा या दुथडी भरून वाहणार्या नदया. धरणातील पाण्याच्या भरवशावर पारंपरिक भात पिकाला फाटा देऊन सर्वत्र रु जविलेली बागायती पिके यामुळे हिरवागार झालेला परिसर असे चित्र इगतपुरी तालुक्यात सर्वच भागात पाहण्यास मिळते .मात्र याच चित्राचा विरोधाभास म्हणून भल्या पहाटे उठून,दुपारच्या रखरखत्या उन्हात, डोक्यावर हंडा घेऊन,पिण्याचे पाणी शोधण्यासाठी महिलांची धडपड अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. इगतपुरी तालुक्यात वैतरणा,दारणा,कडवा,या महा धरणाबरोबर,भावली,भाम,वाकीखापरी,शेणवड ही धरणे .निम्मी मुंबई आण िमराठवाड्याची तहान भागविणारा हा तालुका इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधीमुळे पाण्यासाठी उपेक्षित आहे.