शेतकऱ्यांची सातबारासाठी भटकंती
By admin | Published: October 20, 2016 12:56 AM2016-10-20T00:56:53+5:302016-10-20T01:15:44+5:30
६० गावांचा कारभार ठप्प : तलाठी संघानेच ठोकले कार्यालयांना कुलूप
येवला : विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने येवला तालुका तलाठी संघाने महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या पालघर येथील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अतिरिक्त कारभार असलेल्या तलाठी कार्यालये सील करून कार्यालयाच्या चाव्या येवल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे सुपूर्द केल्याने शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत शासनाने ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. निवेदनावर तलाठी संघाचे अध्यक्ष व्ही.डी. शिंदे, सरचिटणीस संदीप काकड, उपाध्यक्ष कमलेश पाटील, आर.आय. भांड, डी.व्ही. वाघ, आर. एस. काळे, आर. के. खैरे, एस. आर. जोपळे, जयश्री शेटे, मनीषा इगवे यांच्यासह १८ तलाठ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)