मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Published: May 22, 2017 01:22 AM2017-05-22T01:22:39+5:302017-05-22T01:22:49+5:30

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आहे.

Wandering water | मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती

मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती

Next

 लक्ष्मण सोनवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आल्याने दुष्काळ आता त्यांचा वैरी होऊन बसला आहे.
तालुक्यात पशुधनाची संख्या जास्त आहे. गायी ४४ हजार २३० आहेत, तर ३० हजार ९१६ म्हशी आहेत. शेळ्या १९,४५०, मेंढ्या ४०, घोडे ५०, कुक्कुट ३९ हजार ५८० आहेत. त्यात शेळ्या, मेंढ्या, म्हशी आदी जनावरे पशुपालकांनी पाळलेली आहेत. या प्राण्यांची तहान भागविण्याची जबाबदारी इगतपुरी तालुक्यातील प्रशासनावर आहे. सध्यातरी मिळेत तिथे पाणी शोधण्यासाठी जनावरे हिंडत आहेत. त्यांचे पोट भरण्यासाठी चारा व पिण्याचे मुबलक पाणी जनावरांना मिळत नसल्याचे भयाण चित्र दिसत आहे. याबरोबरच वन्यप्राण्यांवरदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनादेखील दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस पाऊले उचलणे काळाची गरज आहे. तालुक्यात चाराटंचाईमुळे शेतकरी दुचाकीवरून मिळेल त्या ठिकाणावरून चारा विकत आणत आहेत. काही शेतकरी गवत विकत घेतात, तर पैशाअभावी तेही मोजक्या शेतकऱ्यांना घेते येत नाही.
प्रत्येक वर्षी निसर्ग बदलत असल्याने उष्णता वाढत आहे. तालुक्यातील तपमान ४० अंश किंवा त्याहून अधिकच आहे. त्या तुलनेत पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्ष चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. इगतपुरी तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाई यावर चर्चा, बैठका, नियोजन अजूनही झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. पाणीबचतीसाठी कठोर धोरण अवलंबवावे लागणार आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर केवळ आता वरवरचे उपाय करून भागणार नाही, तर कायमस्वरूपी एखाद्या योजनेची गरज आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे व तो जमिनीत जिरविण्यासह कूपनलिका खोदून जमिनीची होणारी चाळण थांबवावी लागेल. असे उपाय केल्याशिवाय दुष्काळावर मात करणे शक्य होणार नाही. तालुक्याच्या पूर्व भागात नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ आलेले आहेत. मेंढ्यांना मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने तेही हतबल झाले आहेत.

Web Title: Wandering water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.